फटाक्यांनी जखमींची संख्या २५ च्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:20 AM2017-10-22T01:20:39+5:302017-10-22T01:20:39+5:30
शहरात फटाक्यांमुळे जखमी होणा-यांची संख्या २५ च्या आत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विविध माध्यमांतून होणा-या जनजागृतीमुळे फटाक्यांमुळे जखमी होणा-यांच्या संख्येत यंदा घट झाली आहे. शहरात फटाक्यांमुळे जखमी होणा-यांची संख्या २५ च्या आत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयात भाजलेले रुग्ण आल्यास विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आला होता. गेल्या चार दिवसांत फटाक्यांमुळे हात, तोंडावर जखम झालेले, भाजलेल्या ७ रुग्णांवर घाटीत उपचार करण्यात आले, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. फटाक्याच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले होते. १० जणांवर उपचार करण्यात आले असून, भाजलेल्या रुग्णांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के घट झाल्याचे प्लास्टिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले.