एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल
By संतोष हिरेमठ | Published: October 4, 2022 01:12 PM2022-10-04T13:12:19+5:302022-10-04T13:13:01+5:30
दसरा मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला जात असून, औरंगाबादेतून दसरा मेळाव्यासाठी २५० बसगाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे.
औरंगाबाद : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादेतून अनेक एसटी बसगाड्या रवाना होत आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहे.
जिल्ह्यातून २५० एस. टी. भरून राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत. जिल्ह्यातील ५३६ पैकी २५० एसटी दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. प्रवाशांच्या सेवेत राहणाऱ्या बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे होणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी मुंबईला नेण्याची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली.
दसरा मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला जात असून, औरंगाबादेतून दसरा मेळाव्यासाठी २५० बसगाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठही आगारांतून या बसेस पाठविण्यात येत आहेत. कमी भारमान असलेल्या म्हणजे कमी प्रवासी असलेल्या बसगाड्यांच्या फेऱ्या स्थगित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.