बारावी परीक्षेचे जिल्ह्यात २६ केंद्र

By Admin | Published: February 16, 2016 11:34 PM2016-02-16T23:34:37+5:302016-02-16T23:38:50+5:30

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १८ फेबु्रवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

26 centers in the XII examination district | बारावी परीक्षेचे जिल्ह्यात २६ केंद्र

बारावी परीक्षेचे जिल्ह्यात २६ केंद्र

googlenewsNext

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १८ फेबु्रवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण २६ केंद्रांतून १० हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. २०३ पुनर्परीक्षार्थिंचा समावेश आहे. कॉपीमुक्ती अभियान राबविण्यासाठी शिक्षण विभागाने बैठे व ४ फिरती पथके तैनात केली आहेत.
बारावीच्या परीक्षेस १८ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. कासार यांनी परीक्षा सुरळीत पार पडावी, तसेच परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, याबाबत शिक्षण विभागास सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जि.प. कन्या शाळेत १६ फेबु्रवारी रोजी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील शिक्षणाधिकारी व गंगाधर जाधव यांच्या उपस्थितीत सकाळी बैठक घेण्यात झाली. संबंधित गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यात २६ केंद स्थापन केले. यामध्ये हिंगोलीत ७ केंद्रावरून २०८७ विद्यार्थी, वसमत येथील ८ केंद्रावरून ४११३, औंढा येथील ४ केंद्रावरून १०००, कळमनुरी येथील ३ केंद्रावरून १७७३ तर सेनगाव येथील ४ परीक्षा केद्रांवरून १५९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ ते २ तर दुपारच्या सत्रात व ३ ते ६ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे.

Web Title: 26 centers in the XII examination district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.