ग्रामपंचायतींसाठी २६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:14 AM2017-09-22T00:14:04+5:302017-09-22T00:14:04+5:30

१४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ग्रा.पं.निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा निधी संबंधित ग्रा.पं.च्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता आहे.

26 crores fund for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी २६ कोटींचा निधी

ग्रामपंचायतींसाठी २६ कोटींचा निधी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :१४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ग्रा.पं.निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा निधी संबंधित ग्रा.पं.च्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या वतीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात पहिला हप्ता म्हणून जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झाला आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या १२६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे या निवडणुकीची ९ आॅक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. परिणामी या निधीचे वितरण करता येणार नसल्याची काही अधिकाºयांची भूमिका आहे. काही अधिकाºयांनी या निधीचा आणि ग्रा.पं. निवडणुकीचा काही संबंध नाही, हा नियमित निधी आहे. त्यामुळे आचारसंहितेचा विषय येत नाही, अशी भूमिका मांडली.परंतु, याबाबत एक वाक्यता होत नसल्याने ९ आॅक्टोबरनंतरच या निधीचे ग्रामपंचायतस्तरावर वितरण होण्याची शक्यता आहे.

Web Title: 26 crores fund for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.