मुस्कान-टू मोहिमेत २६ बालकामगारांना दिला न्याय
By Admin | Published: March 1, 2016 11:35 PM2016-03-01T23:35:41+5:302016-03-01T23:50:09+5:30
हिंगोली : हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम मुस्कान आॅपरेशन टू मार्फत जिल्हाभरात राबविली जात आहे.
हिंगोली : हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम मुस्कान आॅपरेशन टू मार्फत जिल्हाभरात राबविली जात आहे. १ जुलै २०१५ पासून संपूर्ण देशामध्ये या मोहिमेत हरवलेल्या किंवा बालकामगार म्हणून पळवून नेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. हिंगोली व औंढा या दोन तालूक्यात एकूण २६ बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यांना बालनिरीक्षणगृह तसेच पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुले हरविल्यांच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अजाण बालकांना त्यांच्या कुटुंबाजवळून पळवून नेल्या जात आहे. मानवी तस्करी करणारे त्यांना राज्याबाहेर नेऊन बालकांना वाममार्ग किंवा बालमजुरी करण्यास भाग पाडत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून हिंगोली येथील संबंधित यंत्रणाही निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मुस्कान आॅपरेशनतंर्गत कारवाई करण्यात आली. १८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरातील बसस्थानकात पोनि जगदीश भंडारवार व पोलिस उपनिरीक्षक पी. एम. पाटकर यांनी कारवाई करून ७ बालकांना ताब्यात घेतले होते. सदर बालकांना मध्य प्रदेशातून बालमजुरीसाठी आणल्याचे उघडकीस आले. त्यांना परभणी येथील बाल निरीक्षणगृहात पाठविले असून त्यांच्या पालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पोलिस उपनिरीक्षक तान्हाजी चेरले यांनी १० बालकामगारांची सुटका करून त्यांना आईवडिलांच्या स्वाधीन केले. तसेच औंढा नागनाथ परिसरात मुस्कान आॅपरेशनतंर्गत पोलिस उपनिरीक्षक सविता सपकाळे यांच्या पथकाने व पोलिसमित्रांच्या मदतीने कारवाई केली. त्यात १० बालकामगारांची सुटका करून चिमुकल्यांना पालकांच्या स्वाधिन केल्याचे सपकाळे यांनी सांगितले.