बीएड, एमएडच्या २६ हजार जागा रिक्त
By Admin | Published: October 2, 2016 01:14 AM2016-10-02T01:14:36+5:302016-10-02T01:20:26+5:30
औरंगाबाद : राज्यातील बी. एड. आणि एम. एड. अभ्यासक्रमाच्या सुमारे २६ हजार जागा रिक्त राहिल्या असून, सीईटी न दिल्याने रिक्त जागांवर प्रवेश घेता येत नसल्याने इच्छुक विद्यार्थीही चिंतेत आहेत.
औरंगाबाद : राज्यातील बी. एड. आणि एम. एड. अभ्यासक्रमाच्या सुमारे २६ हजार जागा रिक्त राहिल्या असून, सीईटी न दिल्याने रिक्त जागांवर प्रवेश घेता येत नसल्याने इच्छुक विद्यार्थीही चिंतेत आहेत.
राज्यातील बी. एड. आणि एम. एड.च्या ३५ हजार जागांपैकी केवळ ९ हजार जागा भरण्यात आल्या आहेत. आॅनलाईन सीईटी न दिल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी अध्यापक महाविद्यालयीन (विनाअनुदानित) प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी कृती समितीने केली आहे. यासंदर्भात प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे यांनी म्हटले आहे की, राजपत्रात विनियमनानुसार सामाईक प्रवेश परीक्षेत आवश्यकतेनुसार सूट देता येते. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी द्यावी.
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, तसेच अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, याचा विचार करून विद्यार्थी प्रवेशाचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.