जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २७ पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:09 AM2017-09-01T00:09:27+5:302017-09-01T00:09:27+5:30

पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.

27 sq.ft increase in soybean production in the district | जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २७ पटीने वाढ

जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २७ पटीने वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.
शेतकरी अलिकडील काळात आधुनिक शेतीकडे वळला आहे. याबरोबरच नगदी पिकांकडे त्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यात ऊसाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र होते. हे क्षेत्र आता १८ हजार ८०० हेक्टरवर गेले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दुष्काळाची तीव्रता असतानाही ऊसाच्या क्षेत्रात २००१ च्या तुलनेत वाढ झाल्याचेच दिसून येते. हीच बाब कापूस उत्पादनाच्या बाबतीत २००१ मध्ये जिल्ह्यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस घेण्यात येत होता.
या क्षेत्रातही मोठी वाढ झाल्याचे २०१६ मधील आकडेवारी पाहिली असता दिसून येते.
२०१५-१६ मध्ये ३ लाख ५२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पिक घेण्यात आले होते. सोयाबिनच्या क्षेत्रात मागील १५ वर्षात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येते. २००१ मध्ये अवघ्या १० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या सोयाबिनचे क्षेत्र २०१५-१६ मध्ये तब्बल २ लाख ७६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर जाऊन पोंहचले आहे. हीच बाब तेलबियाच्या उत्पादनाबाबत २००१ मध्ये जिल्ह्यातील शेतकºयांनी ५१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर तेलबियाचे उत्पादन घेतले होते. हे क्षेत्र आता २ लाख ८६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र एवढे वाढले आहे.

Web Title: 27 sq.ft increase in soybean production in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.