२८ ‘वाँटेड’ गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By Admin | Published: September 30, 2014 01:16 AM2014-09-30T01:16:42+5:302014-09-30T01:31:05+5:30

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

28 'Wanted' criminals' police rushed to the police | २८ ‘वाँटेड’ गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

२८ ‘वाँटेड’ गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext


औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, झोपडपट्टी दादा आणि अनेक वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशनअंतर्गत २८ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात वाँटेड असलेले, तसेच अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिले. गुन्हे शाखेच्या विविध पथकांच्या संयुक्त कारवाईत २८ जणांना अटक करण्यात आली. सिडको पोलीस ठाण्यात १९९५ साली गणपत धनसिंग राठोड (रा.हर्सूल)याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्यास अटक करण्यात आली.
क्रांतीचौक ठाण्यांतर्गत २००६ मध्ये शेख अहमद शेख रहेमान (रा.संजयनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेबूब खान जानी खान ऊर्फ इसाक खान (रा. आशूरखाना, उस्मानपुरा) हा सहा वर्षांपासून फरार होता. आसेफ अजीज कुरेशी, इमरान अजीज कुरेशी, अजमत अजीज कुरेशी (सर्व रा. सिल्लेखाना) हे ५ वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होते. त्यांना अटक करण्यात आली. राजू गजानन काळे (रा. ऐश्वर्या अपार्टमेंट) हा ५ वर्षांपासून फरार होता. आंबेडकरनगर येथील लक्ष्मण शंकर मकळे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात वाँटेड होता. त्यास अटक करण्यात आली.
राहुल गौतम गाडे (२२, रा.शाहूनगर, परभणी) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. योगेश धनसिंग हरणे (रा. गोकुळनगर, जाधववाडी), गणेश सदाशिव बंगाळे (घाटी परिसर), माणिकराव रामराव शिंदे (एन-७, सिडको), हनुमंत माणिकराव कदम (शिवाजीनगर), राजू कचरू जाधव (मिटमिटा), किरण प्रक ाश सनान्से, (साईनगर), इस्माईल बक्ष करीम बक्ष, सय्यद ख्वाजा सय्यद महेमूद, सय्यद फेरोज सय्यद मुक्तार (रा. पैठणगेट, भाजीमंडी) हे दोन वर्षांपासून वाँटेड होते. त्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.
प्रवीण रमेश जमधडे, विशाल विजय केदारे (रा. वडगाव कोल्हाटी), नितीन अर्जुन सोनवणे (रांजणगाव शे.), आसेफ अजीज कुरेशी, इमरान अजीज कु रेशी, अजमत अजीज कुरेशी (सिल्लेखाना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Web Title: 28 'Wanted' criminals' police rushed to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.