जिल्ह्यात २८५ जण होम क्वारंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:27+5:302021-07-26T04:05:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील होम क्वारंटाइनची संख्या सध्या ४१ आहे, तर २८५ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील होम क्वारंटाइनची संख्या सध्या ४१ आहे, तर २८५ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या दोन्ही मिळून ३०६ नागरिक अलगीकरणात आहेत.
विभागात ३१७६ नागरिक क्वारंटाइन
औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या ३१६७ नागरिकांना होम व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात औरंगाबाद ३०६, जालना ६५, परभणी ९६, हिंगोली १८, नांदेड ६४, बीड १७८२, लातूर १३४, उस्मानाबादमध्ये ७४० जण क्वारंटाइन आहेत. ४९७ होम, तर २६७० नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत.
विभागात २२३१ कन्टेन्मेंट झोन
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले कन्टेन्मेंट झोन २२३१ वर आहेत. शहर हद्दीत ४५९, तर ग्रामीण भागात १७२२ झोन आहेत. औरंगाबादमध्ये १५९, परभणीत ६२२, हिंगोली १४६, बीड ११५४, लातूर ६२, उस्मानाबादमध्ये ८८ झोन आहेत.