रेल्वे स्टेशन, विमानतळावर २९२ प्रवाशांची तपासणी, ४ पॉझिटिव्ह
By | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:38+5:302020-12-02T04:07:38+5:30
मसापजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब औरंगाबाद : मराठवाड्यातील साहित्य संस्कृतीच्या चळवळीचे केंद्र म्हणजे मसाप होय. मसाप कार्यालयापासून निराला बाजारकडे ...
मसापजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब
औरंगाबाद : मराठवाड्यातील साहित्य संस्कृतीच्या चळवळीचे केंद्र म्हणजे मसाप होय. मसाप कार्यालयापासून निराला बाजारकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. असंख्य वाहनधारक रॉक्सी चित्रपट समोरील रस्त्यावरून निराला बाजारकडे ये जा करतात. वाहनधारकांना या रस्त्यावर प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका या रस्त्याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही हे विशेष.
शिवाजी हायस्कूलसमोर मोठा खड्डा
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अनुदानातून सिल्लेखाना चौक ते लक्ष्मण चावडी पर्यंतचा रस्ता गुळगुळीत करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम कधी सुरू होईल हे निश्चित नाही. सध्या वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाजी हायस्कूलसमोर मोठा खड्डा पडल्याने वाहनधारकांना अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे.
आझाद हायस्कूलसमोर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
औरंगाबाद : महापालिकेपासून अत्यंत हाकेच्या अंतरावर मौलाना आझाद हायस्कूल आहे. नेहरू भवन कडून महापालिकेकडे येताना उजव्या बाजूला मागील काही दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे जामा मशीदकडे नमाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. विशेष बाब म्हणजे महापालिका प्रशासन अधिकारी याच रस्त्याने ये जा करतात. मंगळवारी प्रशासक सायकलवर जेव्हा या रस्त्यावरून येतील तेव्हा अधिकाऱ्यांना दुर्गंधीचे गांभीर्य येईल.