औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:15 AM2018-05-10T01:15:54+5:302018-05-10T01:17:05+5:30

शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे.

3 days water to Aurangabad city | औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

औरंगाबाद शहराला ३ दिवसाआड पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभारी आयुक्तांचा निर्णय : कडक उन्हाळ्यात नागरिकांची भटकंती थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे. ज्या वॉर्डांना पूर्वी सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणी मिळत होते त्यांना आता चौथ्या दिवशीच पाणी मिळणार आहे. अनेक वॉर्डांना दोन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. आता त्यांना एक दिवस कळ सहन करावी लागणार आहे.
मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेत ‘झोपा काढा’आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातच अंथरूण लावले होते. रात्री ९ वाजता प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. चौधरी यांनी मनपा अधिकाऱ्यांना ठणकावले की, रात्रभर बसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करून वेळापत्रक बुधवारी माझ्याकडे आणावे.
तीन दिवसांआड प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालेच पाहिजे, असे नियोजन असावे, अशी सूचना त्यांनी केली. कार्यकारी अभियंता सरजातसिंग चहल यांनी वेळापत्रक तयार करून आयुक्तांसमोर सादर केले. त्यांनी या नवीन वेळापत्रकाला क्षणार्धात मंजुरीही दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी तिसºया दिवशीचे टप्पे संपविण्यात येतील. शुक्रवारपासून परत शहरात पाण्याचा पहिला टप्पा सुरू होईल. ११ मेपासून संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येईल.
कोणाला फायदा होणार
गुलमंडी, राजाबाजार, शहागंज, लोटाकारंजा, औरंगपुरा, किराडपुरा, बारुदगरनाला, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी, बारी कॉलनी, जकात नाका, बायजीपुरा, रोशनगेट, रामनगर, विठ्ठलनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव, जाधववाडी, सुरेवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, मिलकॉर्नर, भोईवाडा, नागेश्वरवाडी, समर्थनगर आदी वॉर्डांना चौथ्या दिवशी पाणी मिळणार आहे.
दोन दिवसांआड पाणी द्या
माजी महापौरांसह युतीच्या नगरसेवकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले ही आमच्यासाठी खूप भूषणावह बाब नाही. प्रशासनाच्या असंख्य चुकांमुळे ही वेळ आली आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाणी मनपाकडे जमा होते. शहराला दररोज २२२ एमएलडी पाण्याची गरज आहे. मनपाकडे आणखी ५० एमएलडी पाणी अतिरिक्त राहते. दोन दिवसांआड पाणी देणे मनपाला सहज शक्य आहे. तीन दिवसाआड पाणी देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवसाआड पाणी द्यायला हवे. तीन दिवसाआड पाणी प्रशासन देणार असेल तर ४०५ एमएलडी पाणी जमा होणार आहे. गरजेपेक्षा दुप्पट पाणी शहरात राहील. आता टाक्या पूर्ण क्षमतेने भरून पाणीपुरवठा करायला हवा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
क ाँग्रेसचेही व्यापक आंदोलन
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने महापालिकेसमोर व्यापक आंदोलन केले होते. किराडपुरा आणि परिसरातील पाच ते सहा वॉर्डांना पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते.
काँग्रेसने मनपाकडे तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. प्रशासनानेही लेखी स्वरुपात तीन दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.

Web Title: 3 days water to Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.