३ ग्रामपंचायती व बनोटी प्रा.आ. केंद्राचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:55 PM2019-01-15T23:55:57+5:302019-01-15T23:56:18+5:30

सोयगाव : गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई

 3 Gram Panchayats and Banoti Pvt. Center of Panchnama | ३ ग्रामपंचायती व बनोटी प्रा.आ. केंद्राचा पंचनामा

३ ग्रामपंचायती व बनोटी प्रा.आ. केंद्राचा पंचनामा

googlenewsNext

सोयगाव : ऐन दुष्काळात रोहयोची कामे बंद करून चक्क बंद असलेल्या कवली, तिडका आणि नांदगाव ग्रामपंचायतींचा मंगळवारी गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी पंचनामा करून कारवाईसाठी हा अहवाल जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविला आहे. पंचायत समिती स्तरावरून संबंधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा देण्यासाठी तातडीने पंचायत समिती कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोयगावात नव्यानेच रुजू झालेले गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी तालुक्यात दुष्काळी स्थितीत कामे न करणाºया ग्रामपंचायतींची यादीच बनवून या ग्रामपंचायतींना भेटी देण्याचा धडाका हाती घेतला आहे. यामध्ये कवलीचे ग्रामसेवक पंडित ढोले चार दिवसांपासून कार्यालयात हजर नसल्याची माहिती गटविकास अधिकाºयांच्या पथकाला मिळाली. कवली गावात झालेल्या कामांचीही पाहणी केली असता गटारींची कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे राठोड यांच्या निदर्शनास आले. गैरहजर ग्रामसेवक पंडित ढोले, नितीन पाटील (तिडका) आणि समाधान मोरे (नांदगाव) या तीनही ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूत झालेल्या महिलेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या गटविकास अधिकाºयांच्या पथकाला बनोटी आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने या केंद्राचाही पंचनामा करण्यात आला. पथकातील सुभाष जाधव, सचिन सोनवणे आदींनी ही कारवाई केली.

 

Web Title:  3 Gram Panchayats and Banoti Pvt. Center of Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.