३ टक्केच पाणी

By Admin | Published: December 9, 2015 11:30 PM2015-12-09T23:30:41+5:302015-12-09T23:56:54+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड सरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

3 percent water | ३ टक्केच पाणी

३ टक्केच पाणी

googlenewsNext



व्यंकटेश वैष्णव , बीड
सरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत जिल्हयात केवळ ३.०५ टक्केच पाणी शिल्लक आहे.
बीड जिल्हयात एकूण मोठे, मध्यम व लघु असे १४२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ३.०५ टक्के तर २६.९९ दलघमी पाणी शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पात माजलगाव धरणात ७५ दलघमी (मृतसाठा) पाणी आहे. तर केज तालुक्यातील मांजरा धरणात केवळ २.६५३ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. हे दोन्ही मोठे धरण गतवर्षी अल्प पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.
पाणीसाठ्याचा उपसा बेसुमार
जिल्हयातील पाणी साठा केवळ ३ टक्यावर येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने सिंचन प्रकल्पातील अवैध पाणी उपसा थांबवला नाही तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आवघड होण्याची चिन्हे आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून सहा ते सात महिन्याचा आवधी आहे. अशी परिस्थिती उदभवलेली असताना देखील अवैध पाणी उपसा रोकण्याच्याची जबाबदारी दिलेल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र जिल्हयात आहे.
५० टक्के पाणीसाठा असलेले प्रकल्प
एकूण १२४ लघु प्रकल्पापैकी केवळ सहा सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध आहे. खटकळी (बीड), धामनगाव (आष्टी), भोगलवाडी (धारूर), साकूड (अंबाजोगाई), सुलेमान देवळा (आष्टी) या तालुक्यांचा समावेश आहे.
सतत तीन वर्ष पावसाने दडी मारल्याने भूगर्भातील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. बोअर, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. आज घडीला बीड जिल्हयातील १४०४ गावांपैकी २३५ गावांवर टंचाईचे सावट असून शासन सदरील गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवित आहे. यासाठी एकूण १६० टँकर जिल्हयात सुरू आहेत.
जिल्हयात मध्यम प्रकल्पांची संख्या १६ आहे. यापैकी केवळ तीन प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. महासांगवीत ०.७३० द.ल.घ.मी, वाणमध्ये ३.८८५ तर कुंडलिकामध्ये १२.५०० इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: 3 percent water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.