३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी
By Admin | Published: May 12, 2017 12:28 AM2017-05-12T00:28:45+5:302017-05-12T00:29:36+5:30
जालना : अभियांत्रिकी व औषधी निर्माणशाास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील विविध महाविद्यालयांतील १३ केंद्रावर ३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अभियांत्रिकी व औषधी निर्माणशाास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शहरातील विविध महाविद्यालयांतील १३ केंद्रावर ३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली.
जिल्ह्यातील ४ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंंद्रावर पोलिसांकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर पालकवर्गाची मोठी गर्दी दिसून आली. सकाळी १० ते ११.३० या दरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पहिला गणिताचा पेपर घेण्यात आला.
मध्यांतरानंतर १२.३० ते २ वाजेपर्यंत भौतिकशास्त्राचा रसायनशास्त्राचा पेपर घेण्यात आला. ३ ते ४.३० वाजेच्या कालावधीत औषधीनिर्माण शास्त्र विषयाचा परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पारदर्शक पॅड, पेन नेण्यास मुभा देण्यात आली होती. तर स्मार्ट वॉच, मोबाईल, कॅलक्युलेटर किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट परीक्षा केंद्रात आणण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने अनेकांना वेळ बघता आली नसल्याचे सांगितले. शहरातील १३ केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली. शहरातील सर्वच रस्त्याचे कामे सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहण्यास अडणची येऊ नये तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या खोळंबल्यामुळे परीक्षेस विलंब होऊ नये यासाठी अर्धातास आधीच निघण्याचे आवाहन परीक्षा नियंत्रक तथा उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते.
दावलवाडी शिवारातील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरींग कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन नागेवाडी, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, एम. एस. जैन इंग्रजी शाळा, सेंट मेरी हायस्कूल, रेयान इंटरनॅशलन स्कूल, सीटीएमके गुजराती विद्यालय, आदी केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.