वीज बिलांच्या ३ हजार

By | Published: December 4, 2020 04:00 AM2020-12-04T04:00:02+5:302020-12-04T04:00:02+5:30

औरंगाबाद : महावितरणतर्फे ग्रामीण भागात ‘एक गाव, एक दिवस’ आणि शहरी भागात ‘एक वाॅर्ड एक दिवस’ उपक्रम राबविण्यात ...

3 thousand of electricity bills | वीज बिलांच्या ३ हजार

वीज बिलांच्या ३ हजार

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरणतर्फे ग्रामीण भागात ‘एक गाव, एक दिवस’ आणि शहरी भागात ‘एक वाॅर्ड एक दिवस’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात गेल्या २० दिवसांत मराठवाड्यात ७०८ गावात महावितरणची सेवा पोहाेचली आहे. अभियंते, कर्मचारी, जनमित्र व बाह्यस्त्रोतातील ७ हजार ८३४ कर्मचाऱ्यांनी ३ हजार ८०४ वीज बिलांच्या तक्रारींचा निपटारा केला. नवीन वीज जोडण्या देणे, विद्युत वाहिनी व खांब सरळ करणे, अनधिकृत विजेचे आकडे काढणे यासह ८ हजार ६८४ वीज ग्राहकांकडून ९७ लाख २२ हजार ६९६ रूपये वीज बिलाची वसुली केली.

महिनाभरामध्ये २७८

रुग्णांचे डायलिसिस

औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी इमारतीत नोव्हेंबरमध्ये २७८ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली. मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांना डायलिसिस करणे गरजेचे असते. घाटीतील या सुविधेने गोरगरीब रुग्णांची सुविधा होत आहे.

सचखंड एक्सप्रेस पुन्हा अंशत: रद्द

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सचखंड विशेष एक्सप्रेस पुन्हा एकदा अंशत: रद्द करण्यात आली आहे. नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस ३ डिसेंबर राेजी नवी दिल्ली ते अमृतसरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस ५ डिसेंबर रोजी अमृतसर- नवी दिल्लीदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

३ दिवसांत थकीत पगार,

बोनस देण्याची मागणी

औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २२ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. आगामी ३ दिवसात थकीत पगार, बोनस न मिळल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रसिद्धीपत्रकावर युनियनचे सेक्रेटरी ॲड. अभय टाकसाळ, किरणराज पंडित, विकास गायकवाड, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ, नंदा हिवराळे, अजहर जिलानी शेख आदींची नावे आहे.

मेडिसीन विभागात

संशयितांवर उपचार

औरंगाबाद : घाटीतील मेडिसीन विभागात अखेर कोरोनाच्या केवळ संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला तर त्यास पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी इमारतीत हलविण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

Web Title: 3 thousand of electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.