औंढा तालुक्यात ३० मि.मी. पाऊस

By Admin | Published: July 15, 2014 12:16 AM2014-07-15T00:16:48+5:302014-07-15T00:58:07+5:30

हिंगोली : बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्यातील काही भागांमध्ये रविवारी रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला. विशेषत: औंढा नागनाथ तालुक्यात एका रात्रीत ३० मि. मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे.

30 mm in Aunda taluka Rain | औंढा तालुक्यात ३० मि.मी. पाऊस

औंढा तालुक्यात ३० मि.मी. पाऊस

googlenewsNext

हिंगोली : बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्यातील काही भागांमध्ये रविवारी रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला. विशेषत: औंढा नागनाथ तालुक्यात एका रात्रीत ३० मि. मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे.
हिंगोली जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे बळीराजा अस्वस्थ होता.
रविवारी रात्री हिंगोलीसह जिल्ह्यातील पाचही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३० मि. मी. पाऊस औंढा नागनाथ तालुक्यात झाला. त्यानंतर ९.७१ मि. मी. पाऊस हिंगोली तालुक्यात तर ८.७१ मि. मी. पाऊस वसमत तालुक्यात झाला. सेनगाव तालुक्यात ८.५० मि. मी. तर कळमनुरी तालुक्यात ६.१७ मि. मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५६.४२ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा अल्प पाऊस आहे. गतवर्षी यावेळेला ३८९ मि. मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 30 mm in Aunda taluka Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.