सारीचे ३० रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:05 AM2021-04-21T04:05:12+5:302021-04-21T04:05:12+5:30
गॅस दाहिनीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या ...
गॅस दाहिनीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढतच आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलासनगर स्मशानभूमीतील गॅस दाहिनीची देखभाल व दुरुस्ती करण्याची तयारी औरंगाबाद फर्स्ट संस्थेने दर्शविली आहे. यासंबंधी फस्ट संस्थेने मनपा प्रशासकांना पत्र दिले आहे.
संचारबंदीत २७९ नागरिक रस्त्यावर, ४ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरात संचारबंदीत गरज नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये, असे सांगितले असतानाही मंगळवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाला २७९ नागरिक आढळून आले. त्यांची तपासणी केली असता चार जण पॉझिटिव्ह आढळून आले.
शहरात दाखल होणारे ५५ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी सहा ठिकाणी केलेल्या तपासणीत तब्बल ५५ जण पॉझिटिव्ह आढळून आले.