३० टक्के आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीविना !

By Admin | Published: February 6, 2017 10:54 PM2017-02-06T22:54:27+5:302017-02-06T22:57:38+5:30

लातूर :२२८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे़ उर्वरित ११६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले आहे़

30 percent of suicidal farmer family without help! | ३० टक्के आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीविना !

३० टक्के आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीविना !

googlenewsNext

लातूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत ३४८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे़ त्यापैकी २२८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे़ उर्वरित ११६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले आहे़ विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक आहे़
गेल्या तीन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून काहीही उत्पन्न निघाले नाही़ त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊन नैराश्य आलेल्या काही कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले़ गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत गत दोन वर्षांतील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी शासनाच्या आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर केले़ त्यास आवश्यक ती कागदपत्रेही सादर केली़ परंतु, या शेतकऱ्यांवर कर्ज नसल्याने त्यांच्या कुटुंबियांचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: 30 percent of suicidal farmer family without help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.