३०० कोटींचा जिल्ह्यातील व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:25 AM2017-08-23T00:25:58+5:302017-08-23T00:25:58+5:30
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता़ या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ त्यामुळे जिल्ह्यात ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडले़ तर ग्रामीण भागातून येणाºया ग्राहकांची मात्र गैरसोय झाली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता़ या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ त्यामुळे जिल्ह्यात ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडले़ तर ग्रामीण भागातून येणाºया ग्राहकांची मात्र गैरसोय झाली़
सरकारी बँकांचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण करण्यात येऊ नये, मोठ्या उद्योगपतींनी बुडविलेले कर्ज माफ करू नये, जाणून-बुजून बँकेचे कर्ज बुडविणे हा गुन्हा ठरविण्यात यावा, यासाठी संसदेत कायदा पारीत केला जावा, बँक बोर्ड ब्युरो बंद करण्यात यावा, जीएसटीच्या नावाखाली बँकेतील विविध सेवांचे चार्जेस वाढवून सामान्य जनतेची पिळवणूक करू नये, यासह १५ मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता.
या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदवित शहरातील स्टेडियम परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेसमोर २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत निदर्शने केली.
यावेळी भारतीय स्टेट बँक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राम खरटमल, डॉ़ सतीश टाके, आऱएम़ कुलकर्णी, सुनील हट्टेकर, चंद्रकांत लोखंडे, चंद्रकांत मानोलीकर, भास्कर विभुते, लक्ष्मण इनलोलू, सुनिता पाठक, सूर्यकांत निलंगे, मनोज जिंतूरकर, साक्षी घोडेकर, श्याम देशपांडे, सरदार खान, लक्ष्मण उबाळे यांच्यासह अनेक बँक कर्मचाºयांची उपस्थिती होती.
दरम्यान, जिल्ह्यातील बँकांनी मंगळवारी पुकारलेल्या संपामुळे १०० कोटी रुपयांचे नगदी व इतर २०० कोटींचे असे एकूण ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडल्याचे सुत्रांनी सांगितले़