३०० डॉक्टर धावले

By Admin | Published: July 10, 2017 12:36 AM2017-07-10T00:36:36+5:302017-07-10T00:37:31+5:30

बीड : आरोग्य, व्यायाम आणि धावण्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएनशच्या वतीने रविवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

300 doctors ran | ३०० डॉक्टर धावले

३०० डॉक्टर धावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आरोग्य, व्यायाम आणि धावण्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएनशच्या वतीने रविवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३०० डॉक्टरांनी यात सहभाग नोंदवला.
डॉक्टर डे चे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनने आठवडाभरात विविध उपक्रम राबविले. या उपक्रमाचा समारोप रविवारी मिनी मॅरेथॉनने झाला. सकाळी नगर रस्त्यावरील अन्नतंत्र महाविद्यालयाजवळ सर्व डॉक्टर एकत्रित आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिलीप खरवडकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल बारकूल, सचिव डॉ. संतोष शिंदे तसेच संयोजक डॉ. दिवाकर गुळजकर, डॉ. सुधीर हिरवे, डॉ. आप्पासाहेब बागलाणे, डॉ. सुनील नाईकवाडे, डॉ. विश्वास गवते, डॉ. विजय कट्टे यांच्या उपस्थितीत फ्लॅग आॅफ करुन मिनी मॅरेथॉनला प्रारंभ झाला. अन्नतंत्र महाविद्यालय ते म्हसोबा फाटा - पिंपरगव्हाण रोड असा मॅरेथॉनचा मार्ग होता. या मॅरेथॉनमध्ये डॉक्टर दाम्पत्यांनीही सहभाग नोंदवला. बीड, पाटोदा, वडवणी, शिरुर तसेच इतर तालुक्यातील डॉक्टरांनी मॅरेथॉनमध्ये उत्साह दाखवला.
७ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाच्या आतील गटामध्ये डॉ. शशीकांत दहिफळकर प्रथम विजेते ठरले. डॉ. भगवान अतकरे आणि डॉ. किरण कोळेकर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर राहिले. ५० वर्षापुढील गटामध्ये डॉ. विठ्ठल क्षीरसागर हे प्रथम आले. डॉ. सुदाम मोगले, डॉ. विजय सिकची यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
३ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाच्या आतील गटात डॉ. राजू जाधव, डॉ. सावरे आणि डॉ. राऊत यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. ५० वर्षापुढील गटात डॉ. राजीव घुगे हे प्रथम विजेते ठरले. डॉ. सुभाष जोशी आणि डॉ. एस. के. तांदळे यांना संयुक्त द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आला.
७ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाआतील महिलांच्या गटात डॉ. संध्या हुबेकर, डॉ. किरण हिरवे, डॉ. कल्पना दामा प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या. ५० वर्षापुढील गटात डॉ. विनिता ढाकणे, डॉ. विनया राऊतमारे प्रथम व द्वितीय आल्या.
३ किमी मॅरेथॉनमध्ये ५० वर्षाच्या आतील महिलांच्या गटात डॉ. रेणुका खिस्ती, डॉ. कविता वीर, डॉ. रीटा शहाणे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. ५० वर्षापुढील गटात डॉ. संध्या घुगे या प्रथम स्थानी राहिल्या. डॉ. सीमा जोशी आणि डॉ. सुरेखा देशपांडे या द्वितीय व तृतीय स्थानी राहिल्या.

Web Title: 300 doctors ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.