अयोध्याला औरंगाबादमधून शिवसेनेचे ३०० पदाधिकारी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:09 PM2018-11-21T23:09:55+5:302018-11-21T23:10:21+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यासाठी औरंगाबादमधून शिवसेनेचे ३०० पदाधिकारी जाणार आहेत. हजारो शिवसैनिक निघण्याच्या तयारीत होते; मात्र अनेकांना स्थानिक पातळीवरच राममंदिर, शिवसेना शाखांमध्ये महाआरती करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यासाठी औरंगाबादमधून शिवसेनेचे ३०० पदाधिकारी जाणार आहेत. हजारो शिवसैनिक निघण्याच्या तयारीत होते; मात्र अनेकांना स्थानिक पातळीवरच राममंदिर, शिवसेना शाखांमध्ये महाआरती करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख अयोध्येला २४ व २५ सप्टेंबर रोजी राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात जाणार आहेत. या दौºयाची देशभर चर्चा सुरू आहे. वातावरणनिर्मिती करण्यासाठी औरंगाबाद शहरात जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत, तसेच नियोजनासाठी अयोध्येला गेलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांमध्ये औरंगाबादच्या जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. याविषयी अंबादास दानवे यांना विचारले असता, त्यांनी अयोध्येच्या दौºयाची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. औरंगाबादेतून ११ जण चार दिवसांपूर्वीच अयोध्येत दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि.२१) आणखी ३५ जण रेल्वेने दाखल होत आहेत, तर २४ तारखेला ३०० पेक्षा अधिक पदाधिकारी, शिवसैनिक दाखल होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येकडे निघाले होते; मात्र अयोध्येत ज्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाआरती करणार आहेत त्यावेळी स्थानिक पातळीवर प्रत्येक मंदिर, पक्ष कार्यालय, शाखांमध्ये महाआरती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अनेकांना स्थानिक पातळीवरच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. यामुळे ३०० पदाधिकारीच अयोध्येला जातील, असेही दानवे यांनी सांगितले.
संवादाच्या माध्यमातून सभाच होणार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत २५ सप्टेंबर रोजी जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर सभा होणार नसल्याचेही वृत्त आले. याविषयी अंबादास दानवे म्हणाले, सभा होणार नाही. जनतेशी संवाद साधणार आहेत. हा संवादच सभेच्या स्वरूपात होईल. त्यामुळे सभा आणि संवाद सारखेच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.