नाशिकच्या ३०५ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:39 AM2017-12-29T00:39:30+5:302017-12-29T00:39:37+5:30
मुस्तंकीर काचवाला याने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर नाशिकने औरंगाबादविरुद्ध त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला.
१४ वर्षांखालील एमसीए क्रिकेट स्पर्धा : आशुतोष, संकेत यांची उल्लेखनीय कामगिरी
औरंगाबाद : मुस्तंकीर काचवाला याने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर नाशिकने औरंगाबादविरुद्ध त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला. मुस्तंकीर काचवाला याने चौफेर टोलेबाजी करताना १४१ चेंडूंतच २४ चौकारांची आतषबाजी करीत १५५ धावांची स्फोटक खेळी केली. तसेच त्याने तनवीर वर्मा याच्या साथीने तिसºया गड्यासाठी १७१ धावांची भागीदारी करीत नाशिकची स्थिती भक्कम केली. काचवाला याला साथ देणाºया तन्वीर वर्मा याने ८२ चेंडूंत ६ चौकारांसह ५५ आणि यशराज खाडे याने ३८ धावांचे योगदान दिले. औरंगाबादकडून आशुतोष पराये याने ३७ धावांत ४ गडी बाद केले. तनुज सोळुंके याने ७७ धावांत २ व शहद ओपलकर याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जबरदस्त फार्मात असणाºया संकेत पाटील याने औरंगाबादला चांगली सुरुवात करून देताना सागर पवार याच्या साथीने १०.१ षटकांत ४६ धावांची सलामी दिली; परंतु त्यानंतर औरंगाबादने ७ धावांत ३ फलंदाज गमावले आणि त्यातून औरंगाबादचा संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही. सागर पवार याने पुन्हा एकदा सुरेख फलंदाजी करीत ६० चेंडूंत ९ चौकारांसह ४७ धावांची झुंजार खेळी केली. सागर पवारने ३१ चेंडूंत ४ चौकारांसह १८ धावा केल्या. दिवसअखेर औरंगाबादने ११७ धावांत ९ फलंदाज गमावले. आजचा खेळ संपला तेव्हा आशुतोष पराये ४ व शहद ओपलकर ११ धावांवर खेळत होते. नाशिककडून रोशन वाघसरे याने ३२ धावांत ४ गडी बाद केले. त्याला साहील बैरागीने ३ गडी बाद करीत साथ दिली.
संक्षिप्त धावफलक : नाशिक : पहिला डाव ८ बाद ३०५ (घोषित). मुस्तंकीर काचवाला १५५, तन्वीर वर्मा ५५, यशराज खाडे ३८. आशुतोष पराये ४/३७, तनुज सोळुंके २/७७, शहद ओपलकर १/४६).
औरंगाबाद : ९ बाद ११७. (संकेत पाटील ४७, सागर पवार १८. रोशन वाघसरे ४/३२).