ग्रा़पं़साठी मंगळवारी ३१ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:38 AM2017-09-20T00:38:32+5:302017-09-20T00:38:32+5:30
जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मंगळवारी परभणी तालुक्यात २४, मानवत तालुक्यामध्ये ४ आणि जिंतूर तालुक्यात ३ असे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मंगळवारी परभणी तालुक्यात २४, मानवत तालुक्यामध्ये ४ आणि जिंतूर तालुक्यात ३ असे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़
परभणी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदासाठी २२ असे २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सरपंच पदासाठी ६ आणि सदस्य पदासाठी २६ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ३ दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. तालुक्यातील शेंद्रा ग्रामपंचायतीत मंगळवारी सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी २ अर्ज दाखल झाले. पाथरा येथे सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी ११ अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी देशमुख ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी ८ आणि कारेगाव ग्रामपंचायतीत १ उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
मानवत तालुक्यात कोल्हावाडी ग्रामपंचायतीमध्ये ४ सदस्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले़ पाथरी, गंगाखेड, पालम, सेलू, सोनपेठ, पूर्णा या तालुक्यांत मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही़