३२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित !
By Admin | Published: January 31, 2017 12:14 AM2017-01-31T00:14:49+5:302017-01-31T00:15:48+5:30
लातूर : लातूर परिमंडलातंर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील ३२ हजार ४१९ वीजग्राहकांचा थकित बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़
लातूर : लातूर परिमंडलातंर्गत असलेल्या लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील ३२ हजार ४१९ वीजग्राहकांचा थकित बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ दरम्यान, यातील २६ हजार ४९७ थकबाकीदारांनी ९़ २१ कोटी रुपयांचा भरणा केला आहे़
वीजग्राहकांकडून नियमितपणे बिल भरणा होत नसल्याने लातूर परिमंडलात थकबाकीदारांची संख्या वाढत आहे़ साडेचार लाख ग्राहकांकडे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे़ त्यामुळे महावितरणच्या वतीने घरगुती, वाणिज्यक आणि औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांविरुध्द वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे़
जानेवारी महिन्यातील २७ दिवसांत ३२ हजार ४१९ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्यात आला असता त्यातील २६ हजार ४९७ थकबाकीदारांनी ९़२१ कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे़ ही मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून ग्राहकांनी आपले वीजबिल नियमित भरावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता डी़डी़ हामंद यांनी केले आहे़
ग्राहकांनी आपला वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वीच थकबाकी भरावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)