३२०३ पैकी २६ अर्ज ठरले अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:17 AM2017-09-26T00:17:17+5:302017-09-26T00:17:17+5:30
जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.साठी ३ हजार २०३ अर्ज १५ ते २२ ंसप्टेंबर या कालावधीत सरपंच व सदस्यपदासाठी दाखल झाले होते. २५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये सरपंचपदासाठी आलेले ३ व सदस्यपदाचे २३ असे एकूण २६ अर्ज अवैध ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.साठी ३ हजार २०३ अर्ज १५ ते २२ ंसप्टेंबर या कालावधीत सरपंच व सदस्यपदासाठी दाखल झाले होते. २५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये सरपंचपदासाठी आलेले ३ व सदस्यपदाचे २३ असे एकूण २६ अर्ज अवैध ठरले आहेत.
जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी ७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत सरपंचपदासाठी ५५२ व सदस्यपदासाठी २ हजार ६५१ अर्ज दाखल झाले. या अर्जांची सोमवारी सकाळी ११ वाजेपासून छाननी सुरु झाली. यामध्ये परभणी तालुक्यातील साडेगाव येथील पांडुरंग मारोतराव देवडे, पिंगळी येथील सागर गोपीनाथ खिल्लारे, विठ्ठल गौतम सावंत, पिंपरी देशमुख येथील प्रकाश बालासाहेब राजगुरे, नांदखेडा येथील जानका धोंडीबा आहेरकर यांची सदस्यपदासाठी दाखल केलेले अर्ज अवैध ठरले. तर नांदखेडा येथील शकुंतला प्रकाशराव जोंधळे यांनी सरपंचपदासाठी दाखल केलेला अर्ज छाननी अवैध ठरला. पूर्णा तालुक्यातील पिंपरण येथील रमाबाई भीमराव धूतराज, कानडखेड येथील रजियाबी युसूफ खान पठाण, धनगर टाकळी येथील चौतरा सावळाराम साखरे, गौर येथील मिनल विलास जोगदंड, सूमनबाई बेलाजी पांचाळ या पाच जणांचा सदस्यपदासाठीचा अर्ज बाद ठरला आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील २, डिग्रस जहांगीर येथील १, मालेटाकळी येथील १, बोरकिनी येथील १ असे एकूण सदस्यपदासाठीचे ५ अर्ज अवैध ठरले आहेत. पाथरी तालुक्यातील सदस्यपदासाठीचे २ अर्ज अवैध ठरले आहेत. मानवत तालुक्यातील मानोली येथील सदस्यपदासाठीचा कौसा रावसाहेब कनकुटे यांचा अर्ज बाद ठरला आहे. सोनुळा येथील शांता गंगाधर सोनटक्के, आशामती सूर्यभान सोनटक्के हे सरपंचपदासाठीचे अर्ज बाद ठरले आहेत. जिंतूर तालुक्यातील सदस्यपदासाठीचे ५ अर्ज बाद ठरले आहेत. पालम, सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील ग्रा.पं. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जापैकी एकही अर्ज अवैध ठरला नाही.