‘एआरटीओ’मध्ये ४५ पैकी ३३ पदे रिक्त...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:39 AM2017-09-10T00:39:39+5:302017-09-10T00:39:39+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या ४५ पैकी ३३ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 33 posts out of 45 vacant in 'ARTO' ...! | ‘एआरटीओ’मध्ये ४५ पैकी ३३ पदे रिक्त...!

‘एआरटीओ’मध्ये ४५ पैकी ३३ पदे रिक्त...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या ४५ पैकी ३३ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपुºया मनुष्यबळामुळे कारवाया करण्यासह कार्यालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. उपलब्ध अधिकारी, कर्मचाºयांवर कामांचा ताण वाढला आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारीही प्रभारीच आहेत.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यास शासनस्तरावरून उदासिनता असल्याचे समोर आले आहे. वाहन परवाना, वाहन नोंदणी यासारख्या अनेक कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांची एआरआटीओ कार्यालयात गर्दी असते. परंतु येथे वेळेवर कामे होत नसल्याची ओरड सर्वसामान्यांमधून ऐकावयास मिळत आहे. अनेकवेळा वेळेवर कामे होत नसल्याने वादही झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच नियमित असणारे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान यांची जालना येथे बदली झाली. त्यांच्याकडेच बीडचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. परंतु त्यांचीही काही दिवसांपूर्वीच बदली झाली आहे. त्यामुळे पुन्हा हे पद रिक्त झाले आहे.
सध्या याचा अतिरिक्त पदभार औरंगाबादचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नखाते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नखाते हे आठवड्यातून दोन दिवस कार्यालयास भेट देत असल्याचे सूत्रांनी
सांगितले.

Web Title:  33 posts out of 45 vacant in 'ARTO' ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.