सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ३३ विद्यार्थ्यांचे एनडीएच्या परीक्षेत ३३ यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:57 PM2019-06-19T23:57:56+5:302019-06-19T23:58:23+5:30
शहरातील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ४१ व्या तुकडीच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत यश मिळविले आहे.
औरंगाबाद : शहरातील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ४१ व्या तुकडीच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत यश मिळविले आहे.
यूपीएससीतर्फे एनडीएतील प्रवेशासाठी २१ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबादेतील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ३३ विद्यार्थ्यांनी एनडीए संस्थेतील प्रवेशाच्या लेखी परीक्षेत यश मिळविले. देशात ७ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत यश मिळविले आहे. लेखी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी भोपाळ, अलाहाबाद आदी ठिकाणी जावे लागणार आहे़ मुलाखती या संरक्षण दलाच्या तिन्ही दलाच्या आर्मी, एअरफोर्स व नेव्हीकरिता होणार आहेत़ यशस्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होऊन पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला येथे २ जानेवारी २०२० पासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. लेखी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सोहम अपरिजित, समरजित देसाई, प्रथमेश इंगळे, अर्जुन कमलाकर, रवी केजभट, समर्थ कुलकर्णी, यशवंत नागरे, वैभव पाटील, निसर्ग पावडे, अथर्व प्रभू, हर्षवर्धन शॉ, ओम गुप्ता, अभिषेक काटे, सिद्धेश खलदे, चिन्मय मेहंदळे, ओम नायक, दिव्यश पाटील, चषक पटले, अर्णव प्रभाळे, प्रज्ज्वल थोरात, पीयूष थोरवे, अथर्व देशमुख, धु्र ढाकणे, आशुतोष हारपुडे, आनंद हंबड, तुषार इंगळे, अजिंक्य कांबळे, देवांश खेडकर, संगमेश मालावडे, सौरभ नरवणे, जयंत रायकर, आशिष शहा, अथर्व सुर्वे यांचा समावेश आहे़