पैठण लिंकरोडसाठी ३.५ कोटींची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:24 AM2018-02-08T00:24:49+5:302018-02-08T00:24:55+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पैठण लिंक रोडचे काम साडेतीन, तर बिडकीन ते पैठणपर्यंतचे २ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सोबतच नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयांतर्गत जालना रोडचे काम ९ कोटींतून, तर व्हीआयपी रोडचे काम ६ कोटींतून करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने लिंकरोडच्या कामाप्रकरणी वारंवार पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर शासनाने विशेष बाब म्हणून साडेतीन कोटी डांबरीकरणासाठी मंजूर केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पैठण लिंक रोडचे काम साडेतीन, तर बिडकीन ते पैठणपर्यंतचे २ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सोबतच नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयांतर्गत जालना रोडचे काम ९ कोटींतून, तर व्हीआयपी रोडचे काम ६ कोटींतून करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने लिंकरोडच्या कामाप्रकरणी वारंवार पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर शासनाने विशेष बाब म्हणून साडेतीन कोटी डांबरीकरणासाठी मंजूर केले आहेत.
महावीर चौक ते हर्सूल टी-पॉइंट, पैठण लिंकरोड, केम्ब्रिज ते महावीर चौक व बिडकीन ते पैठण रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. वर्षअखेर ही कामे पूर्ण होतील, असा दावा करण्यात येत आहे. महावीर चौक ते हर्सूल हा अरुंद रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येणार आहे. दिल्लीगेट ते हर्सूलपर्यंतचा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेला पैठण लिंकरोड बांधकाम विभागाकडे खड्डेमय झाल्यावर हस्तांतरित करण्यात आला. मुंबईच्या कंत्राटदाराला ४५ कोटी देऊन रस्ते विकास महामंडळाने त्यात हात धुऊन घेतले. डिफेक्ट लायबिलिटी संपेपर्यंत कंत्राटदाराला महामंडळाने अभय दिले. दरम्यान, एमएसआरडीसीने त्या रस्त्याच्या हस्तांतरणाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले़
१४ फेब्रुवारीपासून होणार ई-टेंडरिंग; २१ मार्चपर्यंत मुदत
हर्सूल ते महावीर चौक रस्त्यासाठी ६ कोटी, केम्ब्रिज ते महावीर चौक म्हणजेच जालना रोडसाठी ९ कोटी २९ लाख हे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग करील, तर लिंक रोड साडेतीन कोटी, बिडकीन ते पैठण रोडसाठी २ कोटी रुपयांचे काम बांधकाम विभाग करील. या कामांसाठी १४ फेब्रुवारीपासून ई-टेंडरिंग सुरू होईल. २१ मार्च शेवटची तारीख आहे़
२२ मार्च रोजी निविदा उघडण्यात येतील. कंत्राटदारांना सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट आहे़ दरम्यान, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले की, जालना रोड व व्हीआयपी रोडचे काम मागील तीन वर्षांपासून विविध कारणांनी ते रखडलेले आहे़ सा़ बां़ च्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून त्या कामांना मंजुरी मिळाली आहे.