तब्बल ३५ हजार पर्यटकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:28 AM2017-10-23T01:28:08+5:302017-10-23T01:28:08+5:30

गेल्या आठवडाभरात एकट्या बीबी का मकब-याला सुमारे ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे

35 thousand tourists visited Bibika Makbara | तब्बल ३५ हजार पर्यटकांची भेट

तब्बल ३५ हजार पर्यटकांची भेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळी सुटी सुरू असल्याने राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद शहर पर्यटकांनी गजबजून गेलेले आहे. शहरातील बीबीका मकबरा, सोनेरी महल, पाणचक्की या वास्तंूसह दौलताबादचा किल्ला, म्हैसमाळ, वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे.
ऐतिहासिक वास्तूंच्या आकर्षणापोटी देश-विदेशातील पर्यटक औरंगाबादला भेट देत असतात. दिवाळी सुटीच्या काळात कुटुंब सहलींचे प्रमाण वाढते. गेल्या आठवडाभरात एकट्या बीबी का मकब-याला सुमारे ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी राज्यव्यापी संप केल्याने एसटी बससेवा चार दिवस खंडित झाली होती. त्यामुळे यंदा पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.

Web Title: 35 thousand tourists visited Bibika Makbara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.