शहरात ३५० हातपंप कायमचे बंद
By Admin | Published: December 29, 2014 12:42 AM2014-12-29T00:42:01+5:302014-12-29T00:55:27+5:30
जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे.
जालना : शहरात सुमारे ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद पडल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी नगरपालिकेला सरासरी २० लाखांची गरज भासणार आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकातील १८ लाखांच्या दुरूस्तीचा खर्च ज्या सुरू आहेत, परंतु तात्पुरत्या स्वरूपात बंद पडल्या त्यासाठीच वापरला जातो. त्यामुळे आणखी निधीची व्यवस्था करावी लागणार आहे.
चार लाख लोकसंख्येच्या या शहरात नगरपालिकेने विविध ठिकाणी एकूण १२६० हातपंप उभारलेले आहेत. हातपंपांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी सुमारे १८ लाखांचा वार्षिक खर्च केला जातो. यामध्ये कोणत्या ना कोणत्या भागातील हातपंपांच्या दुरूस्तीचे काम नेहमीच सुरू असते. या दुरूस्तीचे काम एका खाजगी एजन्सीवर सोपविण्यात आलेले आहे.
परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ३५० हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. त्यांच्या दुरूस्तीसाठी हातपंपांचे सुटे भाग खरेदी करावे लागणार आहे. उर्वरीत ९५० हातपंप सुरू आहेत. परंतु काही भागात पाणीपातळी कमी असल्याने सुमारे ४०० हातपंप उन्हाळ्याच्या काळात काही दिवस बंद असतात. त्यामुळे यावर्षी पालिकेने अशा हातपंपांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर दुरूस्ती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)४
जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेमुळे शहराचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. घाणेवाडी जलाशयात सद्यस्थितीत १२ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहरात फारशी टंचाई भासणार नाही, असा विश्वास नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.