३५४ बसेस ‘कोरोना फ्री’, प्रवासी मात्र बेफिकीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:04 AM2021-09-22T04:04:57+5:302021-09-22T04:04:57+5:30

औरंगाबाद : जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत. या गाड्यांची अँटी मायक्रोबियल कोटिंग ...

354 buses 'Corona Free', only passengers are safe! | ३५४ बसेस ‘कोरोना फ्री’, प्रवासी मात्र बेफिकीर!

३५४ बसेस ‘कोरोना फ्री’, प्रवासी मात्र बेफिकीर!

googlenewsNext

औरंगाबाद : जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत. या गाड्यांची अँटी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बसेस कोरोना फ्री होत चालल्यामुळे प्रवासी देखील बेफिकीर होत चालले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३५४ बसेस कोरोना फ्री झाल्या आहेत.

...........

किती बसेसना झाले कोटिंग

एकूण ५६० गाड्यांपैकी ३५४ गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले आहे. गरजेनुसार गाड्यांचे कोटिंग करून घेता येऊ शकते.

........................................................................

आगार.................. .... कोटिंग झालेल्या गाड्यांची संख्या

१) सिडको....................५६

२) मध्यवर्ती बसस्थानक- ११९

३) पैठण- ४१

४) सिल्लोड - २९५) वैजापूर - ३७

५) कन्नड - २५

६) गंगापूर - २०

७) सोयगाव - २७

......................................

एका एसटीला वर्षातून सहा वेळा होणार कोटिंग

एका एसटीला वर्षातून सहा वेळा कोटिंग होणार आहे. दोन महिन्यांतून एकदा, असे कोटिंग केले जाईल. मुंबईच्या एका कंपनीला या कामाचे कंत्राट दिले आहे. एका गाडीच्या कोटिंगचा खर्च १४०० रुपये इतका असतो.

..............................................................

मास्कशिवाय प्रवेशच नाही

सध्या ५० टक्के क्षमतेने एसटी गाड्या धावत आहेत. या गाड्यांचे सॅनिटायझिंग केले जातेच. शिवाय एसटीत मुळातच प्रवाशाने तोंडाला मास्क लावलेला नसेल, तर त्याला बसमध्ये प्रवेशच दिला जात नाही.

- किशोर सूर्यवंशी, यंत्र अभियंता चलन

..............................................................

आता भीती वाटत नाही

कोरोनाच्या सावटामुळे पूर्वी एसटीचाच काय, कसलाही प्रवास भीतीदायक वाटत होता. आता बसेसच्या कोटिंगमुळे ही भीती कमी झाली. मी औरंगाबादला माझ्या भावाकडे महालक्ष्मीनिमित्त आले होते. आता परत उस्मानाबादला गावी परतत आहे.

- मंगल पुजारी, प्रवासी

..........................................................

घाबरण्याचे कारण नाही

एसटीचा प्रवास आता सुखावह झाला आहे. घाबरण्याचे कारण उरलेले नाही. मी जाॅबनिमित्त औरंगाबादला आलो होतो. पुन्हा यावे लागणार आहे.

- सुशांत मुळजकर

...........................................

Web Title: 354 buses 'Corona Free', only passengers are safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.