३६९ ग्रा.पं.नाच कामगिरीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:44 AM2017-11-04T00:44:45+5:302017-11-04T00:44:52+5:30
जिल्ह्यातील ५६३ पैकी ३६९ ग्रामपंचायतीच परफॉर्मंस ग्रँटसाठी पात्र ठरल्या आहेत. लेखापरीक्षण व उत्पन्नवाढीच्या निकषात पात्र न ठरल्याने इतर ग्रा.पं.ना या निधीपासून वंचित राहावे लागले आहे. यात गतवर्षीसाठी यंदा ४.१७ कोटी रुपये वितरित केले आहेत. यंदा पुन्हा या योजनेत सहभागासाठी शासन निर्णय झाल्याने संधी प्राप्त होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ५६३ पैकी ३६९ ग्रामपंचायतीच परफॉर्मंस ग्रँटसाठी पात्र ठरल्या आहेत. लेखापरीक्षण व उत्पन्नवाढीच्या निकषात पात्र न ठरल्याने इतर ग्रा.पं.ना या निधीपासून वंचित राहावे लागले आहे. यात गतवर्षीसाठी यंदा ४.१७ कोटी रुपये वितरित केले आहेत. यंदा पुन्हा या योजनेत सहभागासाठी शासन निर्णय झाल्याने संधी प्राप्त होणार आहे.
अनेक ग्रामपंचायतींनी वर्षानुवर्षे आपण केलेल्या कामाचेच लेखापरिक्षण केलेले नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींना परफॉर्मंस ग्रँट देणे शक्य नव्हते. गतवर्षी ४.१७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्वच ग्रामपंचायतींना यात संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने मार्चनंतरही संधी दिली होती. त्यामुळे हा निधी ग्रामपंचायतींना वितरित होण्यासाठी आॅगस्टपर्यंतची वाट पहावी लागली होती. यानंतर लेखापरिक्षण व उत्पन्नवाढीसह प्रस्ताव दाखल न करणाºया ग्रा.पं.ला वगळण्यात आले. उर्वरित ग्रा.पं.ला लोकसंख्येसाठी ९0 टक्के तर क्षेत्रफळासाठी १0 टक्के याप्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे वित्त आयोगाचा आधी निधी मिळालेला असतानाही हा नवा निधी मिळालेल्या ग्रा.पं.चा फायदा झाला. त्यांना यातही काही कामे करणे शक्य होणार आहे. मोठ्या ग्रा.पं.ना तर घसघशीत निधी मिळाला. यात हिंगोलीत ५९ ग्रा.पं.ला ७४.७८ लाख, वसमतला ७८ ग्रा.पं.साठी १.११ कोटी, कळमनुरीत ९६ ग्रा.पं.साठी १.२0 कोटी, सेनगावात ८७ ग्रा.पं.साठी १.१८ कोटी तर औंढ्यातील ३९ ग्रा.पं.साठी ५३.५0 लाख वितरित झाले.