३७ अधिकारी, ३५० पोलिसांची महामॅरेथॉनमध्ये झाली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:22 AM2017-12-18T01:22:09+5:302017-12-18T01:24:14+5:30

लोकमतच्या वतीने रविवारी आयोजित महामॅरेथॉन स्पर्धा विना अडथळा पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या आदेशाने मॅरेथॉन मार्गावर तब्बल ३७ पोलीस अधिकारी आणि ३३६ पोलीस कर्मचा-यांची मदत झाली.

 37 officers, 350 police help in Mahamarethon | ३७ अधिकारी, ३५० पोलिसांची महामॅरेथॉनमध्ये झाली मदत

३७ अधिकारी, ३५० पोलिसांची महामॅरेथॉनमध्ये झाली मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमतच्या वतीने रविवारी आयोजित महामॅरेथॉन स्पर्धा विना अडथळा पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या आदेशाने मॅरेथॉन मार्गावर तब्बल ३७ पोलीस अधिकारी आणि ३३६ पोलीस कर्मचा-यांची मदत झाली. विशेष म्हणजे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, पोलीस वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. एच. भापकर हे पहाटे चार वाजेपासून मॅरेथॉन मार्गावर नजर ठेवून होते.
लोकमततर्फे रविवारी शहरात महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा विविध प्रकारांत ही महामॅरेथॉन प्रचंड उत्साहात पार पडली. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला. एकाही स्पर्धकाला त्रास होणार नाही, याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली. विभागीय क्रीडा संकुल येथून सर्व प्रकारची मॅरेथॉन सुरुवात झाली आणि विविध टप्पेपार करून स्पर्धक पुन्हा क्रीडा संकुलावर परतले. २१ किलोमीटरचा मॅरेथॉन विभागीय क्रीडा संकुल येथून निघून शहानूरमियाँ दर्गा चौक, रोपळेकर चौक, काल्डा कॉर्नर, अमरप्रीत चौक, क्रांतीचौक उड्डाणपुलाखालून, सतीश मोटार्स चौक, वीर सावरकर चौक, निरालाबाजार, महात्मा फुले चौक, खडकेश्वर चौक, मिल कॉर्नर, ज्युबिलीपार्क चौक, टाऊन हॉल उड्डाणपुलावरून आमखास मैदान, अण्णाभाऊ साठे चौक, दिल्लीगेट, हडको कॉर्नर, सिद्धार्थ चौक, टी.व्ही. सेंटर चौक, आय.पी. मेस चौक, बळीराम पाटील शाळा चौक, बजरंग चौक, वोखार्ट चौक, जळगाव टी पॉइंटमार्गे सेव्हन हिल पुलाखालून गजानन महाराज मंदिर चौकमार्गे गारखेडा रोडने परत विभागीय क्रीडा संकुल येथे आली. या मार्गावर प्रत्येक चौकात आणि रस्त्यावर वाहतूक शाखेचे आणि संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तैनात होते.
तुटलेल्या दुभाजक आणि चौकातून धावणाºया वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. सहायक पोलीस आयुक्त शेवगण, निरीक्षक मधुकर सावंत, निरीक्षक हनुमंतराव गिरमे, जवाहरनगरचे निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, पुंडलिकनगरचे निरीक्षक अशोक मुदीराज, उस्मानपुराचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे, सिटीचौकचे निरीक्षक हेमंत कदम, बेगमपुरा ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल रोडे, सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती, सहायक निरीक्षक अशोक आव्हाड यांच्यासह तब्बल ३७ पोलीस अधिकारी आणि ३३७ कर्मचारी पहाटे चार ते साडेदहापर्यंत मॅरेथॉन मार्गावर तैनात होते.
जवाहरनगर पोलिसांकडून चार स्वागतकक्ष
मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या संकल्पनेतून मॅरेथॉन मार्गावर तीन ठिकाणी स्वागतकक्ष उभारण्यात आले. शिवाय स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी आणि सुमारे ३०० विशेष पोलीस अधिकारी हे एनर्जी ड्रिंक, पाण्याच्या बॉटल्स आणि संत्रा गोळ्या वाटप करीत होते. पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्पर्धकांनी कौतुक केले.
विभागीय क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार, जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरील गारखेडा चौक, रोपळेकर चौक आणि गजानन महाराज मंदिर रोडवरील कडा कार्यालयासमोर जवाहरनगर पोलिसांनी स्वागत कक्ष उभारले होते. या कक्षासमोर रस्त्यावरून धावणाºया धावपट्टूला पोलीस कर्मचारी आणि विशेष पोलीस अधिकारी उर्त्स्फू तपणे एनर्जी ड्रिंक, पाण्याच्या बॉटल्स आणि संत्र्या गोळ्या देत होते. पोलिसांच्या अनेक पोलीस धावपट्टूंना धावण्यासाठी चिअरअप करून त्यांचा उत्साह वाढविताना दिसत होते. यात ३०० विशेष पोलीस अधिकाºयांनी सहभाग नोंदविला.

Web Title:  37 officers, 350 police help in Mahamarethon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.