३७०० अर्ज : १५३८ शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:25 AM2017-11-16T00:25:27+5:302017-11-16T00:25:34+5:30
तालुक्यातील ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आॅनलाईन अर्जानुसार ३ हजार ७०० शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरले असून, १ हजार ५३८ शेतकºयांना अजुनही कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यातील ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आॅनलाईन अर्जानुसार ३ हजार ७०० शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरले असून, १ हजार ५३८ शेतकºयांना अजुनही कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
२ हजार १६२ शेतकºयांचा ग्रीन यादीमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यात एकूण १८ हजार ५०० शेतकरी कुटूंब असून, त्यापैकी ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले होते. त्यापैकी पहिल्या ग्रीन यादीमध्ये केवळ २ हजार १६२ शेतकºयांचा समावेश झाला आहे, अशी माहिती मंठ्याचे सहाय्यक निबंधक के. एम. शहा यांनी दिली. शहा म्हणाल्या की, बॅँकांनी अपूर्ण माहिती दिल्याने कमी शेतकºयांना कर्जमाफी मिळाली आहे. अनेक बॅँकांनी आधार कार्ड व अन्य कागदपत्रे न दिल्याने ग्रीन यादीत अनेकांची नावे आलेली नाहीत. असे असले तरी सुधारीत यादीत उर्वरित नावे येतील. लाभार्थीं शेतकºयांचे चावडीवाचन करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, मंठा तालुक्यात ३ हजार ७०० शेतकºयांपैकी २ हजार १६२ शेतकºयांचे ग्रीन यादीत नावे आले खरे; परंतू त्यांना नेमके किती रुपयांचे कर्ज माफ झाले, याबाबत सहाय्यक निबंधक शहा यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हा आकडा बॅँकांनी अद्याप दिला नसल्याचे त्या म्हणाल्या.