मनपाच्या निवडणूक रिंगणातील ३८ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
By Admin | Published: April 15, 2017 11:28 PM2017-04-15T23:28:25+5:302017-04-15T23:34:23+5:30
लातूर : गुन्हेगारी प्रकरणातील तब्बल ३८ जण मनपा निवडणुकीत आहेत़ त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़
लातूर : गुन्हेगारी पार्श्वभूमी, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होऊ शकेल अशा प्रलंबित प्रकरणातील तब्बल ३८ जण मनपा निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उरतले आहेत़ त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ उमेदवारांनी निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या माहितीनुसार निवडणूक विभागाकडून मतदान केंद्राबाहेर प्रत्येक उमेदवारांची मालमत्ता, गुन्हे, कर्ज आदी माहिती डकविली जाणार आहे़ प्रभाग क्ऱ ५ मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिकटे यांच्यावर सर्वाधिक १२ गुन्हे दाखल असून ही प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत़
मनपा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४०७ पैकी ३८ जणांवर गुन्हे दाखल आहेत़ यात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, अपक्षांचाही समावेश आहेत़ प्रभाग क्ऱ ९ क) भाजपाचे लालासाहेब (पप्पू ) धोत्रे - १, प्रभाग क्र १० ब) राजकुमार आकनगिरे १, विद्यमान महापौर व काँग्रेसचे उमेदवार दीपक सूळ- १, प्रभाग १४ अ) पद्मभूषण मांदळे १, प्रभाग १५ ड) अपक्ष नीलेश करमुडी १, प्रभाग १७ अ) सुनील मलवाड २, प्रभाग १७ क) गिरीश पाटील १, प्रभाग ६ अ) तुळशीराम दुडीले १, प्रभाग १६ अ) काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण कांबळे १, हनुमान जाकते २, प्रभाग १८ क) अजगर पटेल १, प्रभाग ७ क) मीनाबाई बालाजी माने १, प्रभाग ७ ड) रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिकटे १२, प्रभाग २ क) मुजम्मील शेख १, प्रभाग ८ अ) पृथ्वीसिंग बायस २, सचिन ढवळे १, ८ ब) काँग्रेसच्या मीनाताई अशोक सूर्यवंशी १, भाजपाच्या गीता सतीश गौड २, प्रभाग ४ अ) आनंद हरिचंद्र सुरवसे ४, ब) राष्ट्रवादी काँग्रेसच्या इर्शाद मौलाना तांबोळी १, ड) राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र इंद्राळे १, एमआयएमचे मोहम्मद मुजीब हमदुले १, प्रभाग ५ ड) स्थायी समितीचे विद्यमान सभापती तथा काँग्रेसचे उमेदवार विक्रांत विक्रम गोजमगुंडे ३, अब्दुल रहिम शेख १, प्रभाग १२ अ) काँग्रेसचे संजय ओव्हळ १, एमआयएमचे बसवंत उबाळे ५, १२ ब) भाजपाच्या दीपाताई गीते ४, १३ अ) अर्चना दत्तू आल्टे १, अपक्ष दीपिका शिवमूर्ती बनसाडे १, लक्ष्मी राहुल दंडे १, ड) भाजपाचे धनराज साठे १, प्रभाग १ ब) भाजपाचे देवीदास रामलिंग काळे ३, काँग्रेसचे मनोजकुमार राजे १, ड) भाजपाचे अॅड़ शैलेश गोजमगुंडे ३, प्रभाग क्ऱ २ ब) भाजपाचे रवि वीरेंद्र सुडे ८, क) एमआयएमचे अॅड़ मुश्ताक साहेबअली सौदागर १, सय्यद अस्लम नवाब १, शकील मकबुल वलांडीकर १ यांच्यावर गुन्हे दाखल आहेत़ दरम्यान, निवडणूक विभागाला देण्यात आलेल्या शपथपत्रात उमेदवारांनी ही माहिती दिली आहे़ शासकीय कामात अडथळा, सभा, आंदोलन आदी प्रकारातील हे गुन्हे आहेत़