जिल्ह्यात २४ तासांत ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:31+5:302021-04-18T04:04:31+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १,६०० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६१८, तर ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या उच्चांकी ...

39 corona patients die in 24 hours in the district | जिल्ह्यात २४ तासांत ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १,६०० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६१८, तर ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या उच्चांकी ९८२ रुग्णांचा समावेश आहे, तर गेल्या २४ तासांत तब्बल ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ आणि अन्य जिल्ह्यांतील ७ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये घाटीतील परिचारिकेसह २० ते ८९ वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,७०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ५७१ झाली आहे, तर आतापर्यंत ८९ हजार ७३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,१३४ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ९९२ आणि ग्रामीण भागातील ७४६ अशा १,७३८ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना बोडखा, खुलताबाद येथील ४५ वर्षीय पुरुष, घोडसाला, सोयगाव येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, बीड बायपास येथील ४० वर्षीय महिला, सेंटर नाका येथील ५० वर्षीय पुरुष, गोलवाडी येथील ६५ वर्षीय महिला, गोलटगाव येथील ७३ वर्षीय पुरुष, आडगाव येथी ७९ वर्षीय महिला, घाटी परिसरातील ५८ वर्षीय महिला, बेगमपुरा येथील रहिवासी आणि घाटीतील ३१ वर्षीय परिचारिका, रामगाेपालनगर, पडेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिला, पैठण येथील ४४ वर्षीय महिला, म्हाडा काॅलनीतील ७० वर्षीय पुरुष, नागसेननगर येथील ६५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ४१ वर्षीय पुरुष, श्रीकृष्णनगर येथील ६७ वर्षीय महिला, पैठण येथील ७५ वर्षीय महिला, कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, वारेगाव येथील ७३ वर्षीय महिला, कन्नड येथील ७० वर्षीय महिला,

बजाजनगर येथील ६८ वर्षीय महिला, एन-९ येथील ६० वर्षीय महिला, वैजापूर येथील ५४ वर्षीय पुरुष, लासूर स्टेशन येथील ५१ वर्षीय पुरुष, ढाकेफळ येथील ८० वर्षीय महिला, गणेशनगर येथील ६० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ३० वर्षीय पुरुष, कासलीवाल मार्व्हल येथील ८९ वर्षीय पुरुष, एन-१ येथील ८१ वर्षीय पुरुष आणि बुलडाणा जिल्ह्यातील २० वर्षीय युवती, जालना जिल्ह्यातील ६९ वर्षीय महिला तसेच ६५ वर्षीय महिला, जळगाव जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला तसेच ७० वर्षीय पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील ७३ वर्षीय पुरुष तसेच ८१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

घाटीत परिचारिकेच्या मृत्यूने हळहळ

घाटीतील परिचारिकेचे २०१८ मध्ये किडनी प्रत्यारोपण झाले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे ९ एप्रिलपासून घाटीत उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परिचारिकेच्या मृत्यूने घाटीत हळहळ व्यक्त करण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर ३, विमानतळ २, रेल्वेस्टेशन कॅम्प २, देवगाव रंगारी , रेल्वेस्टेशन कॅम्प १, बीड बायपास १६, उस्मानपुरा १, समर्थनगर १, कांचनवाडी ६, सातारा परिसर १९, उल्कानगरी ८, पडेगाव ६, शिवाजीनगर ८, श्रीनिकेतन कॉलनी २, नंदनवन कॉलनी ३, देवळाई परिसर १२, एन -१, सिडको ११, मिलकॉर्नर १, सिडको एन -८ येथे ४, मुकुंदवाडी २, नाथनगर ५, कॅनॉट सिडको ४, पिसादेवी रोड परिसर १७, हर्सूल ९, एन-९ सिडको ३, गारखेडा परिसर १३, एन -१२ येथे ८, राजाबाजार २, बंजारा कॉलनी १, नक्षत्रवाडी ४, पैठण १, जवाहर कॉलनी ३, भानुदासनगर २, पदमपुरा ६, अन्य ३, देवनगरी १, हॉटेल गिरनार १, एन-११ येथे ४, विटखेडा १, एसआरपी कॅम्प २, पटेल लॉन्स १, राजगुरूनगर १, नाईकनगर २, कासलीवाल मार्बल ७, राज हिल्स १, सर्वेश्वरनगर १, साईनगर २, साऊथ सिटी १, देशमुखनगर २, एन-७, पोस्ट ऑफिस १, सिडको १, शांतिनिकेतन कॉलनी १, सुधाकरनगर २, गणेश प्लाझा १, राजेशनगर १, अलोकनगर १, पृथ्वीनगर २, वृंदावन कॉलनी १, पेठेनगर २, फकीरवाडी १, पुंडलिकनगर ४, पटेलनगर १, प्रतापनगर १, आरेफ कॉलनी १, हायकोर्ट कॉलनी ४, मंजीतनगर १, जटवाडा रोड परिसर ३, श्रीकृष्णनगर १, नूतन कॉलनी १, आयएफएल फायन्सास १, एन-६, सिडको २, चिकलठाणा ५, एन-३, सिडको २, म्हाडा कॉलनी ४, जयभवानीनगर ५, गजानननगर २, संजयनगर १, एसटी कॉलनी ३, एन-२, सिडको ३, रामनगर १, हनुमाननगर ३, एन-४, सिडको ४, विश्रांतीनगर २, बजरंगनगर १, मुकुंदनगर १, मुकुंदवाडी २, श्रद्धा कॉलनी १, एमआयटी शाळा १, मयूर पार्क ७, महाजन कॉलनी १, धर्तीधन सोसायटी १, गुलमोहर कॉलनी, एन-५ सिडको ५, नवनाथनगर ४, चेतनानगर १, गणेशनगर २, अरिहंतनगर २, बालाजीनगर १,सूतगिरणी चौक १, खिवंसरा पार्क ५, विष्णूनगर १, निराला बाजार १, साईनगर १, विशालनगर २, स्वप्ननगरी १, रेणुकानगर १, समतानगर २, सिंधी कॉलनी १, शिवनेरी कॉलनी १, त्रिमूर्ती चौक ३, देशमुखनगर २, विवेकानंदपुरम २, कैलासनगर १, जाधवमंडी १, एन-७, सिडको ५, कामगार कॉलनी १, नारेगाव २, घृष्णेश्वर कॉलनी १, हडको कॉर्नर १, स्वामी विवेकानंदनगर १, नवजीवन कॉलनी १, टेलिकॉम सोसायटी १, अशोकनगर १, लेबर कॉलनी १, कोहीनूर कॉलनी १, श्रेयनगर १, हिमायतबाग १, राजनगर १, दलालवाडी १, टूरिस्ट होम १, अजबनगर १, बन्सीलालनगर १, झेडपी ग्राऊंड १, वेदांतनगर १, मिल कॉर्नर १, पहाडसिंगपुरा १, जालाननगर १, शहानूरवाडी १, शिवशंकर कॉलनी १, अन्य २४१.

ग्रामीण भागातील रुग्ण

तीसगाव २, करमाड ३, शेंद्रा ८, पंढरपूर १, गोकुळवाडी १, वाळूज १, बजाजनगर १, कोलते टाकळी १, निल्लोड १, वैजापूर १, वरझडी २, सिडको महानगर १, एएस क्लब, वाळूज ३, अन्य ९५६.

Web Title: 39 corona patients die in 24 hours in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.