PFI च्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक; NIA आणि ATS ची औरंगाबादेत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:42 PM2022-09-22T12:42:08+5:302022-09-22T12:44:05+5:30
औरंगाबाद एटीएसच्या मदतीने ही संमिश्र कारवाई करण्यात आली आहे.
अमेय पाठक
औरंगाबाद - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची संबंधित असलेल्या चार जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतला आहे शहरातील विविध भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की मुंबई पुणे ठाणे नाशिक या भागामधील एटीएसटी कारवाई सुरू आहे.
त्याच पार्श्वभूमीवर रात्रीपासून औरंगाबाद शहरात पुणे व मुंबई येथील एटीएसचे पथक औरंगाबाद दाखल झाले होते. औरंगाबाद एटीएसच्या मदतीने ही संमिश्र कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये टोमॅटो डिलिव्हरी बॉय असलेला व पूर्वी पी एफ आय शी संबंधित असलेला सय्यद फैसल याला हडको भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर इमरान मील्ली याला किराडपुरा भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोघांपैकी एक जण हा औरंगाबाद येथील रहिवासी असून इतर जिल्ह्यात झाला होता .त्याला देखील ताब्यात घेतले आहे या चौघांची चौकशी सध्या औरंगाबाद सुरू आहे.