शहरात ४ हजार सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:26 AM2018-03-05T00:26:55+5:302018-03-05T00:27:01+5:30
शहराच्या कानाकोप-यात आणि चौकाचौकांत लवकरच चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यासाठी स्मार्ट सिटीमधून १०० कोटी आणि राज्य सरकारच्या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या कानाकोप-यात आणि चौकाचौकांत लवकरच चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यासाठी स्मार्ट सिटीमधून १०० कोटी आणि राज्य सरकारच्या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिन्यांत कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांना दिली.
आयुक्त म्हणाले की, शहरात यापूर्वी २ कोटी रुपये खर्च करून ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. आता आम्ही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर करण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट सिटीतून मिळालेल्या निधीतून चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कॅमे-यांच्या निगराणीसाठी दोन नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. यातील एक कक्ष पोलीस आयुक्तालयात तर दुसरा महानगरपालिकेत असेल.
या प्रकल्पांतर्गत तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी चेहरा ओळखणारे काही कॅमेरे प्रमुख रस्त्यांवरील चौकात असतील. तर दुसरे एनपीआर प्रकारचे कॅमेरे आहेत. आॅटोमॅटिक नंबर प्लेट रेकनायझिंग कॅमे-यांमुळे वाहतूक नियम मोडून पळणा-यांवर कारवाई क रणे पोलिसांना सोपे जाईल. संबंधित वाहनाच्या नंबरच्या आधारे त्या वाहनचालकांना घरपोच दंडाच्या नोटिसा पाठवून कारवाई केली जाईल. ‘ पॅन ट्रेड झूम’(पीटीझेड) आणि फिक्स कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. पीटीझेड कॅमेरे हे शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक चौकात हे कॅ मेरे असतील. ३६० अंशेंमध्ये ते फिरत असतात आणि चौकातील प्रत्येक हालचालींवर या कॅमेºयांची नजर असते. एवढेच नव्हे तर हे कॅमेरे आॅटोमॅटिक पद्धतीने झूम होतात, त्यामुळे रस्त्यांवरील व्यक्तीचा चेहरा आणि त्याच्या वाहनांचा अचूक क्रमांक ते टिपतात. फिक्स झूम कॅमेरेही पोलिसांना लाभदायक ठरणार आहेत.