4 वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू, सिल्लोड न्यायालयाने जीप चालकास सुनावली १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 06:20 PM2018-01-17T18:20:46+5:302018-01-17T18:22:48+5:30
आईसोबत एसटीबसची वाट पाहत असणा-या 4 वर्षीय मुलीचा जीपच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिल्लोड न्यायालयाने आरोपी चालकास 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा अपघात निल्लोड फाट्यावर 2013 साली घडला.
सिल्लोड (औरंगाबाद ) : आईसोबत एसटीबसची वाट पाहत असणा-या 4 वर्षीय मुलीचा जीपच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिल्लोड न्यायालयाने आरोपी चालकास 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा अपघात निल्लोड फाट्यावर 2013 साली घडला होता.
शिक्षा झालेल्या आरोपी चालकाचे नाव सुधाकर प्रकाश सुरासे ( रा. मुठाड.ता. भोकरदन ) असे आहे. या प्रकरणी सरकारी अभियोक्ता नितीन कोघे यांनी दिलेल्या माहिती नुसार, 11 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 9:30 वाजता वृषाली ही 4 वर्षीय चिमुकली आपली आई पंचफुलाबाई व मावशी सरला यांच्यासोबत निल्लोड फाट्यावर बसची वाट बघत उभी होती. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या जिपने (एमएच 28 -9592) तिला जोराची धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जिप चालक सुधाकर प्रकाश सुरासे यांच्या विरोधात वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक फौजदार वरपे यांनी सिल्लोड न्यायालयात चारशीट दाखल केला.यानंतर सिल्लोड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. जी. चव्हाण यांनी सात साक्षीदार तपासून आरोपी सुधाकर यास कलम 279 अनव्ये 3 महिने सश्रम कारावास, व कलम 304 अनव्ये 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.