१४ सहायक निरीक्षकांसह ४१ फौजदारांच्या बदल्या
By Admin | Published: June 1, 2016 12:07 AM2016-06-01T00:07:08+5:302016-06-01T00:19:29+5:30
औरंगाबाद : पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर सहायक निरीक्षक आणि फौजदारांचीही खांदेपालट करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी
औरंगाबाद : पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर सहायक निरीक्षक आणि फौजदारांचीही खांदेपालट करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी १४ सहायक निरीक्षक आणि ४१ फौजदारांच्या बदल्या केल्या. गुन्हे शाखेची पूर्णत: साफसफाई करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे वादग्रस्त सहायक निरीक्षक शेख अकमल यांची बदली क्रांतीचौक ठाण्यात करण्यात आली आहे. बदल्या झालेले इतर सहायक निरीक्षक पुढीलप्रमाणे. (कंसात बदलीचे ठिकाण).
श्यामकांत पाटील, वाचक शाखा (वाहतूक शाखा), शेषराव उदार, सिटीचौक (गुन्हे शाखा), शाहिद सिद्दीकी, सिटीचौक (क्रांतीचौक), अर्जुन पवार, क्रांतीचौक (सिटीचौक), अनिल परजणे, वाळूज (सिडको), गजानन कल्याणकर, गुन्हे शाखा (सायबर सेल), उन्मेष थिटे , गुन्हे शाखा (सायबर सेल), राहुल खावकर, सायबर सेल (मुकुंदवाडी), विजय घेरडे, मुख्यालय (क्रांतीचौक), अशोक आव्हाड, क्रांतीचौक (मुकुंदवाडी), अशोक गंगावणे, सिडको (छावणी), दीपाली निकम, विशेष तपास पथक (पैरवी अधिकारी), मनोज बहुरे (नियंत्रण कक्ष).
पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे नूतनीकरण केले आहे. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या शाखेच्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
जुन्या ‘डीबी’ पथकातील कर्मचाऱ्यांची रवानगी ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. पुन्हा ‘डीबी’ शाखेत काम करणार नाही, या अटीवर त्यांना ठाणी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.