४१८ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र

By Admin | Published: April 1, 2016 12:40 AM2016-04-01T00:40:38+5:302016-04-01T00:58:32+5:30

जालना : जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५५७ उमेदवार मैदानी चाचणीसाठी आले होते

418 candidates qualify for field trials | ४१८ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र

४१८ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र

googlenewsNext


जालना : जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५५७ उमेदवार मैदानी चाचणीसाठी आले होते. त्यापैकी ४१८ उमेदवार चाचणीत फिट ठरले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली.
शिपाई भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सुरू झाली. भरती प्रकियेचा आजचा तिसरा दिवस होता. ५५७ उमेदवारांपैकी ४१८ उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या भरती प्रक्रियेसाठी पोलिस शिपाई पदासाठी मंगळवारपासून राज्य राखीव दलाच्या मैदानावर चाचणीला सुरूवात होणार आहे. २७ शिपाई पदांसाठी तब्बल ५ हजार ३३८ अर्ज आले आहेत. त्यात ३ पदे महिलांसाठी राखीव आहेत.

Web Title: 418 candidates qualify for field trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.