४२ हजारांची दु:खीनगरात घरफोडी

By Admin | Published: November 14, 2015 12:07 AM2015-11-14T00:07:17+5:302015-11-14T00:49:22+5:30

जालना : जुना जालना भागातील दु:खीनगरातील मुस्तफा शेख दगडूमिया यांचे घर फोडून चोरट्यांनी ४२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

42 thousand villagers in Ghinigar | ४२ हजारांची दु:खीनगरात घरफोडी

४२ हजारांची दु:खीनगरात घरफोडी

googlenewsNext


जालना : जुना जालना भागातील दु:खीनगरातील मुस्तफा शेख दगडूमिया यांचे घर फोडून चोरट्यांनी ४२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
दु:खीनगरातील रहिवासी मुस्तफा शेख हे आपल्या कुटुंबासह सोमवारी औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. बुधवारी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
सोमवार ते बुधवार असे तीन दिवस त्यांच्या घराला कुलूप होते. याचा चोरट्यांनी फायदा घेत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ४२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी संतोष बाजीराव मिंदर यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात चोरट्यांनी दानपेटी व त्यातील सात ते नऊ हजारांची रोकड लंपास केल्याचे नमुद केले. त्यावरून गोंदी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोहेकॉ जाधव हे करीत आहे.

Web Title: 42 thousand villagers in Ghinigar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.