जायकवाडीत धरणात ४२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:38 AM2018-08-24T00:38:05+5:302018-08-24T00:38:29+5:30

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन टीएमसीने भर पडली आहे.

42% water supply in Jayakwadi dam | जायकवाडीत धरणात ४२ टक्के जलसाठा

जायकवाडीत धरणात ४२ टक्के जलसाठा

googlenewsNext

पैठण : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन टीएमसीने भर पडली आहे.
वरील धरणातून होणारे विसर्ग आज घटविण्यात आले आहेत. विसर्गात झालेली घट लक्षात घेता जायकवाडी धरणात येणारी आवक कमी होण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक व नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाऊस उघडला असून गेल्या २४ तासात त्र्यंबकेश्वर २० मि.मी., इगतपुरी ६२ मि. मी., घोटी ४० मि. मी. याच ठिकाणी पाऊस झाला. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे.
दारणा १८००, गंगापूर १५६०, पालखेड २२१३ क्युसेक्सपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला. या सर्व धरणाचे पाणी नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यात जमा होते. नांदूर -मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात काल २०२४४ क्युसेक्स एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता, तो आज १११५२ क्युसेक्सपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीचा पूर ओसरत आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणाप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातूनसुध्दा विसर्ग घटविण्यात आला आहे. भंडारदरा २०३७, निळवंडे ६३०० व ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात ६३०१ क्युसेक्स असा विसर्ग आज ठेवण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०८.६८ फूट झाली असून धरणात एकूण जलसाठा १५९४.७२४ दलघमी (५६.३१ टीएमसी) तर जीवंत जलसाठा ८५६.६१८ दलघमी ( ३०.२४ टीएमसी)
एवढा झाला होता.

Web Title: 42% water supply in Jayakwadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.