अहमदनगर, नाशिकच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात आले ४.२६ टीएमसी पाणी
By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 15:06 IST2023-12-01T15:05:25+5:302023-12-01T15:06:15+5:30
या पाण्यामुळे जायकवाडीचा जिवंत जलसाठा ४४.२६ टक्के झाला

अहमदनगर, नाशिकच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात आले ४.२६ टीएमसी पाणी
छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समृूह धरणांतून २४ नोव्हेंंबर रोजी रात्री शासनाला मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणात आतापर्यंत ४.२६ टी.एम.सी.पाणी आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दिली.
या पाण्यामुळे जायकवाडीचा जिवंत जलसाठा ४४.२६ टक्के झाल्याचे कडा अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी सांगितले. समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार यावर्षी मराठवाड्याला ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील दारणा, भंडारदारा, निलवंडे, ओझर केटीवेअर, मुकणे, कदवा, गंगापूर, मुळा प्रकल्पातून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी दिला.