पटरी ओलांडली, पाणी पिले पण परत येताना घात झाला; ४३ मेंढ्यांना रेल्वेने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 18:52 IST2022-10-03T18:51:19+5:302022-10-03T18:52:31+5:30
औरंगाबादहून जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेस समोर मेंढ्याचे कळप आल्याने हा अपघात घडला.

पटरी ओलांडली, पाणी पिले पण परत येताना घात झाला; ४३ मेंढ्यांना रेल्वेने चिरडले
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील करमाड जवळ असलेल्या सटाणा शिवारात ४३ मेंढ्या गाय बैल व दोन वासरे यांचा दुपारी सव्वातीनच्या सुमारास रेल्वेने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पटरी ओलांडून तलावातून पाणी पिऊन पुन्हा आपल्या ठिकाणी येत असताना हा अपघात घडला.
औरंगाबादहून जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेस समोर मेंढ्याचे कळप आल्याने हा अपघात घडला. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बानगाव टाकळी येथील हे मेंढपाळ असून यांनी जवळपास तीनशे मेंढ्या करमाड शिवारात बसवल्या होत्या. पट्टीच्या दुसऱ्या बाजूने तलाव असून पाणी पिऊन परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.