सिल्लोड तालुक्यात ४४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:03 AM2021-03-17T04:03:57+5:302021-03-17T04:03:57+5:30
आढळलेल्या रुग्णांमध्ये सिल्लोड तालुक्यातील पानवडोद १, सारोळा १, निल्लोड १, बाळापूर २, अजिंठा ५, दीडगाव ३, सावखेडा बुद्रूक १, ...
आढळलेल्या रुग्णांमध्ये सिल्लोड तालुक्यातील पानवडोद १, सारोळा १, निल्लोड १, बाळापूर २, अजिंठा ५, दीडगाव ३, सावखेडा बुद्रूक १, शिवना ३, अंभई १, धोत्रा १, धानोरा १, डोईफोडा १, पिंपळगाव पेठ १, तळवाडा ४, मोहाल २, खुल्लोड ३ असे एकूण ३१ रुग्ण सापडले आहे. यातील रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, तर आठ रुग्ण होमक्वारंटाइन करण्यात आले आहे, तर संपर्कातील सुमारे ९० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन न.प.चे मुख्याधिकारी रफिक कंकर, देवेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
चौकट....
तालुक्यात आतापर्यंत ५१ लोकांचा मृत्यू
सिल्लोड तालुक्यात एका वर्षात ५१ कोरोनाबांधितांचा मृत्यू झाला आहे. १ फेब्रुवारी ते १६ मार्चपर्यंत एकूण ७६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यापैकी ६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर ६९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी दिली.