औरंगाबादचे ४५ विद्यार्थी सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:58 AM2017-07-19T00:58:50+5:302017-07-19T01:02:30+5:30
औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियातर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियातर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर झाला. शहरातून या परीक्षेसाठी बसलेल्या ३८२ विद्यार्थ्यांपैकी ८४ जण उत्तीर्ण झाले. यापैकी ४५ विद्यार्थी सीए झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात चांगली वाढ झाली आहे.
औरंगाबादमधून या परीक्षेला ‘गट-१’साठी २२२ विद्यार्थी आणि ‘गट-२’साठी १६० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ‘गट-१’मध्ये ४६ तर ‘गट-२’मध्ये ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १२ उत्तीर्ण झाले. प्रणव राठी या विद्यार्थ्याने ५०१ गुणांसह शहरातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
सकाळी ११ वाजता आॅनलाइन निकाल जाहीर झाला. सीएची अंतिम परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी खूप कमी असते. त्यामुळे यंदाचा निकाल औरंगाबाद शहरासाठी विशेष ठरला आहे.