४६ हजार १५३ मतांची होणार प्रत्येक फेरीत मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:40 PM2019-05-22T23:40:18+5:302019-05-22T23:40:54+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात प्रारंभ होणार असून, २६ फेºयांतील मतमोजणीनंतर पूर्ण निकाल हाती येणार असून, प्रत्येक फेरीत अंदाजे ४६ हजार १५३ मतांची मोजणी होणार आहे. २३ एप्रिल रोजी १८ लाख ८६ हजार २९४ मतदारांपैकी ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रि येसाठी २०२१ नियंत्रण यंत्रसंच (कंट्रोल युनिट) मतदानासाठी वापरण्यात आले.
मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट हाताळणे आणि मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने बुधवारी दुपारी ३ वाजता कर्मचाºयांची रंगीत तालीम घेतली. या कार्यक्रमाची माहिती प्रशासनाने बाहेर येऊ दिली नाही. मतमोजणी आणि केंद्र याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. एवढी गोपनीयता कशामुळे ठेवली, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. केंद्र परिसरात काय व्यवस्था आहे, पार्किंग कशी असणार, सामान्य नागरिकांना माहिती कशी मिळणार, माध्यम सुविधा काय आहेत. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्यासाठी मतदान केंद्रांची निवड सोडतीने करणार की इतर प्रकारे, हेदेखील प्रशासनाने समोर आणले नाही.
मतमोजणी केंद्रातील तीन सभागृहांमध्ये प्रत्येकी दोन विधानसभा क्षेत्रांची मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या देखरेखीत ती मतमोजणी होणार आहे. निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाºयांसाठी वेगळे कक्ष असणार आहेत.
मतमोजणी केंद्रातील व्यवस्था अशी-
केंद्र जालना रोडच्या सर्व्हिस रोडलगत आहे. दक्षिणमुखी केंद्राच्या डाव्या बाजूला मतमोजणीसाठी येणाºया अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि केंद्र सुविधांसाठी काम करणाºयांसाठी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. सामान्य नागरिकांसाठी विमानतळासमोरून पाठीमागे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे पार्किंग व फेरीनिहाय निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
१८ व्या फेरीपर्यंत होणार चित्र स्पष्ट
१८ व्या फेरीपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ६० टक्के मतमोजणी या फेरीपर्यंत होईल. ११ लाख ९५ हजार २४२ पैकी ८ लाख ३० हजार ७५४ मतदान या फेरीपर्यंत मोजले जाईल, असा अंदाज आहे. या फेरीपर्यंत विजय कोणाच्या बाजूने आहे, याचा बºयापैकी अंदाज आलेला असेल.