थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत ४८ संघांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:15 AM2018-02-20T01:15:19+5:302018-02-20T01:15:27+5:30

एमएसएम येथे आजपासून सुरू झालेल्या छत्रपती चषक थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत ४८ संघांनी सहभाग नोंदवले. आज साखळी फेरीतील लढती पार पडल्या. त्यात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेल्टिक केवेलर्स संघाने गोल्डन बुल्स संघावर १२-४, औरंगाबाद सेंट्रल संघाने संस्कार विद्यालयाचा १०-७, गोल्डन बुल्स संघाने सेंट फ्रान्सिसचा १५-५, संस्कार विद्यालयाने सेंट फ्रान्सिसचा १०-९ आणि सेल्टिक केवेलर्सने औरंगाबाद सेंट्रलचा ८-७ असा पराभव केला.

 48 teams have participated in the three-a-three basketball tournament | थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत ४८ संघांचा सहभाग

थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत ४८ संघांचा सहभाग

googlenewsNext

औरंगाबाद : एमएसएम येथे आजपासून सुरू झालेल्या छत्रपती चषक थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत ४८ संघांनी सहभाग नोंदवले. आज साखळी फेरीतील लढती पार पडल्या. त्यात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेल्टिक केवेलर्स संघाने गोल्डन बुल्स संघावर १२-४, औरंगाबाद सेंट्रल संघाने संस्कार विद्यालयाचा १०-७, गोल्डन बुल्स संघाने सेंट फ्रान्सिसचा १५-५, संस्कार विद्यालयाने सेंट फ्रान्सिसचा १०-९ आणि सेल्टिक केवेलर्सने औरंगाबाद सेंट्रलचा ८-७ असा पराभव केला. मुलीच्या गटात एमएसएमने जेएएसई संघाचा ६ वि. ४ बास्केटने पराभव केला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात डीएफसीने जेएएएसई संघावर १५ वि. ४ बास्केटने मात केली. याच गटात डीएफसीने आॅल स्टार्स संघावर १५ वि. ११ ने मात केली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात एमएसएमने सीएसएसए संघावर ४ वि. ३ बास्केटने विजय मिळवला. आज झालेल्या संघात विविध संघांतील अनुराग हिरे, हर्ष स्वामी, प्रेम मिश्रा, अफ्फान अहमद सादेक, प्रियांशू मिश्रा, सौरभ गाडेकर, कुणाल जैन, प्रियांशू संकलेचा, रोहित वाघ, मनीष चव्हाण, प्रशांत बोर्डे, कृष्णा शर्मा, अथर्व काथार, शरद मात्रे, अथर्व पखाले, सूरज कदम, शैलेश वखरे, सौरभ बोंबले, महावीर संचेती, हर्षवर्धन पाटील, गौरव पटेल, अन्वी महाजन, गौरी पाटील, तनवी चोटलानी, पूनम बैरागी, इशिका खंबाट, भूमी कपूर, पूनम बैरागी, अनन्या शर्मा, अनुष्का जोशी, गायत्री कजाले, पायल मिसाळ, लबदी जैन व निशा जाधव आदींनी चमकदार कामगिरी केली, असे स्पर्धा आयोजन सचिव गणेश कड यांनी कळविले आहे.

Web Title:  48 teams have participated in the three-a-three basketball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.