तीन वर्षांत ४८० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:11 AM2017-09-08T00:11:49+5:302017-09-08T00:11:49+5:30

शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.

480 suicides in three years | तीन वर्षांत ४८० आत्महत्या

तीन वर्षांत ४८० आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.
नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि चांगले पीक हाती लागल्यानंतरही त्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो. यातूनच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. अशा स्थितीत कर्ता पुरुष गेल्याने शेतकºयांच्या कुटुंबाची स्थिती अधिकच दयनीय होत असल्याचे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. नांदेड जिल्हाही याला अपवाद नाही.
मागील १३ वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असले तरी मागील तीन वर्षांत अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. २००३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या २ घटना घडल्या होत्या. २००४ मध्ये ही संख्या २९ वर गेली. त्यानंतर २००५ मध्ये ११, २००६ मध्ये ६०, २००७ मध्ये ७२, २००८ मध्ये ५९, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ५५, २०११ मध्ये ३३, २०१२ मध्ये ३९ तर २०१३ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या जिल्ह्यात ४६ घटना घडल्या.
अलीकडील तीन वर्षांत या घटनांत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल ११८ घटना पुढे आल्या आहेत. हीच परिस्थिती २०१५ मध्येही कायम राहिली. या वर्षात १९० शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. तर २०१६ मध्ये १८० शेतकºयांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या घटनांचा अभ्यास केला असता अनेकांनी विषारी औषध प्राशन केले. काहींनी गळफास घेतला तर काहींनी विहिरीत उडी मारुन आपले आयुष्य संपविल्याचे दिसते.
मागील वर्षभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. २४ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणाही केली.
मात्र त्यानंतरही आत्महत्येच्या घटना थांबलेल्या नाहीत. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील १०४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्येच्या या प्रश्नाकडे राज्य शासनाने अधिक संवेदनशीलपणाने पाहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील तेरा वर्षात जिल्ह्यात ९५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असल्या तरी त्यातील ६६६ शेतकºयांच्या कुटुंबियांनाच शासकीय मदत मिळाली आहे.

Web Title: 480 suicides in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.